पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रविवारी (२६ फेब्रुवारी) मतदान प्रक्रिया पार पडणार असल्याने या दिवशी मतदान केंद्राच्या शंभर मीटर अंतरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, गाडे, टपऱ्या आणि सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी काढला आहे. पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी काढलेल्या या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
कसबा मतदारसंघातील निवडणुकीच्या दृष्टीने १८ जानेवारीपासून आचारसंहिता लागू झाली आहे. रविवारी मतदान होणार असून २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू असेल.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समर्थ, फरासखाना, विश्रामबाग, खडक, दत्तवाडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोटनिवडणूक होत आहे. ७६ मतदान केंद्रांवरील २७० बूथवर मतदान होणार आहे. मतदान सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता आणि मालमत्तेला धोका पोहोचू नये यासाठी मतदान केंद्रांच्या शंभर मीटर परिसरातील सर्व दुकाने, उपाहारगृहे, गाडे, टपऱ्या आणि सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नसलेल्या राजकीय व्यक्तीस किंवा राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीस या मतदारसंघात थांबता येणार नाही किंवा वास्तव्य करता येणार नाही.
………………..
चौकट
विजयी मिरवणुकीवर बंदी
कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) येथील गोदामात २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडण्यासाठी गोदामाच्या परिसरातील दोनशे मीटर अंतरात सुरक्षा दल वगळता कोणासही शस्त्र बाळगता येणार नाही. या परिसरात मोबाइल, ध्वनिक्षेपक, वाहने यांच्या वापरावर प्रतिबंध असेल. मतमोजणीच्या परिसरात कोणताही मजकूर लिहिता येणार नाही. निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढता येणार नाही, असे आदेश पोलिसांनी काढले आहेत.