पिंपरी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागांत लाक्षणिक, साखळी उपोषण सुरू आहे. आंदोलक आक्रमक झाल्याने महामार्ग रोखू नयेत, यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या महामार्गांवर पोलिसांनी गस्त वाढविली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातून तीन महामार्ग आणि एक द्रुतगती मार्ग जातो. पुणे-बंगळुरू महामार्ग, जुना पुणे-मुंबई महामार्ग, पुणे-नाशिक महामार्ग आणि पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग हे शहरातून जाणारे प्रमुख महामार्ग आहेत. राज्यात कुठेही आंदोलन झाले तरी त्याचे पडसाद महामार्गांवर उमटतात. त्यामुळे पोलिसांनी महामार्गांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. महामार्गावर कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, वाहतूक विस्कळीत होऊ नये यासाठी पोलिसांनी महामार्गांवर गस्त वाढवली आहे. आंदोलक रस्त्यांवर टायर जाळतात. त्यामुळे पोलिसांनी रस्त्यावर पडलेले तसेच गॅरेजसमोर ठेवलेले टायर जप्त केले आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजादेखील बंद केल्या आहेत.

nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Narendra Modi statement that Congress wants to end OBC reservation
काँग्रेसला ओबीसी आरक्षण संपवायचे -मोदी
Traffic congestion on Mumbai Ahmedabad National Highway due to lack of planning
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नियोजनाअभावी वाहतूक कोंडी, तासंतास अडकून पडल्याने प्रवाशांचे हाल
apmc premises free from traffic jams due to measures taken by the traffic police
एपीएमसी परिसर वाहतूक कोंडीमुक्त; वाहतूक पोलिसांच्या उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त

हेही वाचा – पुणे : कारागृहात आयुष्य काढावे लागण्याच्या भीतीने ससूनमधून पळालो! अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची कबुली

निगडी तहसील कार्यालयावर आज मोर्चा

पिंपरीत साखळी उपोषण सुरू असलेल्या सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आक्रमक भूमिका घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. निगडीतील तहसील कार्यालयावर २ नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. आकुर्डीतील खंडोबा माळापासून सकाळी ११ वाजता मोर्चा सुरू होणार असल्याचे मारुती भापकर यांनी सांगितले.

शांततेच्या मार्गाने आंदोलनाचे आवाहन

मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची चौकट आखून दिली आहे. त्या चौकटीतच राहून आंदोलन व्हावे. जाळपोळ, हिंसाचार करू नये, समाजमाध्यमांतील खोट्या पोस्ट, अफवांवर विश्वास ठेवू नये, शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा – पिंपरीतील व्यावसायिक मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण सुरू

आमदार, खासदारांनी चोवीस तासांत भूमिका स्पष्ट करावी

मराठा आरक्षणाबाबत शहरातील लोकप्रतिनिधींनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आण्णा बनसोडे, अश्विनी जगताप, उमा खापरे यांच्याविषयी समाजात प्रचंड नाराजी आहे. येत्या २४ तासांत आमदार, खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा लवकरच समाज भेटीला येईल असा इशारा देण्यात आला.