पुणे : मुंढव्यातील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी हुक्का पात्र आणि सुगंधी तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी हाॅटेल मालकासह व्यवस्थापकाविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंढव्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत होते. या परिसरातील एका हाॅटेलमध्ये बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. हाॅटेलमधून हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू असा सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी हाॅटेल मालकासह, व्यवस्थापकाविरुद्ध सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) सन १९१८ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा >>>पुणे: महापालिका भवनजवळ दोघांना लुटले; रिक्षाचालकासह साथीदाारविरुद्ध गुन्हा
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस कर्मचारी तानाजी देशमुख, प्रमोद टिळेकर, पृथ्वीराज पांडुळे, शुभांगी म्हाळशीकर, संजयकुमार दळवी यांनी ही कारवाई केली.