शिरुर : शिरुरमधील कवठे येमाई परिसरात बेकायदा गावठी दारु अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत एक लाख ५४ हजारांची गावठी दारू, गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, ताडी, तसेच साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अक्षय बाळू देवकर, सागर गणपत गंडगुळ (दोघे रा. कवठे येमाई, ता. शिरुर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत, अशी माहिती शिरुर पोलीस ठाण्योच पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> मंतरवाडीत गोदमला आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण

कवठे येमाई परिसरातील घोडनदी पात्रात देवकर आणि गंडगुळ गावठी दारू तयार करत होते. गावठी दारू, तसेच ताडीची बेकायदा विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक केंजळे, हवालदार भवर, सांगळे, सुद्रिक, रावडे, सचिन भोई यांनी छापा टाकला. या कारवाईत एक लाख ५४ हजार रुपयांची गावठी दारू, दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, ताडी, तसेच अन्य साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी जप्त केलेले साहित्य जागेवच नष्ट केले. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार तपास करत आहेत. शिरुर परिसरात बेकायदा गावठी दारू तयार करत असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक केंजळे यांनी केले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police raid on illegal country liquor dens in shirur pune print news rbk 25 zws