पुणे- नाशिक महामार्गावरील हॉटेल सरकार अँड लॉजवर गेल्या काही महिन्यापासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले आहे. पैशाचे अमिश दाखवून तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. पिंपरी- चिंचवडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन पीडित तरुणींची सुटका केली आहे. अजित संजीवनाल गौतम आणि सुधाकर संजीवा शेट्टी अशी गुन्हा दाखल झालेल्या लॉज चालक आणि मालक यांची नावं आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या लॉजवर वेश्या व्यवसायाचा हा गोरख धंदा सुरू होता. त्याचा पर्दाफाश करण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये हॉटेल्स, लॉज आणि स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याच्या अनेक घटना समोर आलेले आहेत. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने संबंधित ठिकाणी छापे मारून अनेक तरुणींची यातून सुटका केलेली आहे. असं असताना पुणे- नाशिक महामार्गावरील हॉटेल ‘सरकार’ या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं उजेडात आलं आहे. अनैतिक मानवी वाहतूक विभागाने बनावट ग्राहक पाठवून खरंच त्या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो की नाही याची खात्री करून त्या ठिकाणी छापा टाकला. गेले काही महिन्यापासून हॉटेल सरकार इथे वेश्या व्यवसायाचा गोरख धंदा सुरू होता. पैशांची फूस लावून दोन तरुणींना या व्यवसायात ओढलं गेलं होतं. त्यांची अनैतिक मानवी वाहतूक विभागाने सुटका केली असून लॉज चालक आणि मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
canada tourist visa
कॅनडाने १० वर्षांचा टुरिस्ट व्हिसा का थांबवला? कॅनडाला वारंवार भेट देणार्‍या नागरिकांवर होणार परिणाम?

आणखी वाचा-पुणे : संगणक अभियंता ‘सेक्सटाॅर्शन’च्या जाळ्यात; १० लाखांची फसवणूक

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सिंह सिसोदे, धैर्यशील सोळंके, विजय कांबळे, सुनील शिरसाट, सुधा टोके, भगवंता मुठे, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, संगीता जाधव आणि सोनाली माने यांच्या टीमने केली आहे.