पिंपरी- चिंचवडमधील आयटी हब हिंजवडीत स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय करणाऱ्या चालक आणि मालकाचा अनैतिक मानवी वाहतूक विभागाने पर्दाफाश केला आहे. वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून त्यांची सुटका केली आहे. याप्रकरणी ऋषीकेश मुकेश निकाळजे, गणेश राजाराम घेवडे आणि रितेश अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये स्पाच्या नावाखाली पैशांचे अमिश दाखवून महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक विभागाला मिळाली. पोलिसांनी खात्री केली. मग, पोलिसांनी भूमकर चौकातील ‘द वेदा’ या स्पा सेंटरवर छापा टाकून चार महिलांची सुटका केली आहे.

हेही वाचा – वायनाडमधील पराभवाच्या भीतीने राहुल गांधींचा रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय – विनोद तावडे

हेही वाचा – बारामती बँकेतून ५०० रुपयांच्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

महिलांना पैशाचे अमिश दाखवून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी स्पा मालक आणि चालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आल आहे. भा.द.वी कलम क.३७० (३),३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.