हाॅटेल मालकासह महिलेवर गुन्हा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लोणावळा : लोणावळ्यातील एका हाॅटेलमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवयासाचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी हाॅटेल मालकासह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. लोणावळ्यातील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर सुदर्शन हाॅटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला.

हाॅटेल मालक सतीश शेट्टी (वय ५९) याच्यासह एका महिलेच्या विरोधात लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक फाैजदार मारुती गोफणे यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. या कारवाईत दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची रवानगी निरीक्षणगृहात करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कारंडे, सहाय्यक फौजदार मारुती गोफणे, अण्णा बनसोडे, हवालदार मसळे, शिंदे आदींनी ही कारवाई केली. लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल तपास करत आहेत.

हेही वाचा >>> पुणे: धावत्या पीएमपी बसमध्ये महिलेशी लगट करणारा पोलिसांच्या ताब्यात

खंडाळ्यात ६८ हजारांचा मद्यसाठा जप्त

खंडाळ्यातील शिवाजी पेठ परिसरात बेकायदा मद्यसाठा करुन विक्री केल्या प्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ६८ हजार २२० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी अजय रामचंद्र जांभुळकर (वय ५६, रा. शिवाजी पेठ, खंडाळा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जांभुळकर याच्याकडून देशी आणि विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. हवालदार मयूर आबनाने यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक सीताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मुजावर तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police raids on prostitution in hotels in lonavala crime against woman hotel owner pune print news rbk 25 ysh