तरुणीवर बलात्कार केल्या प्रकरणी एका डाॅक्टरच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. डाॅक्टर पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.डाॅ. अंकुश गुंड (रा. गणेश व्हिला, आंबेगाव, कात्रज) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने भारतीय विद्यापीठ पोलीस टाण्यात फिर्याद दिली आहे. डाॅ. गुंड आणि तरुणीची ओळख झाली होती. तरुणीने डाॅ. गुंडने जाळ्यात ओढले.
हेही वाचा >>>पुणे: कर्वे रस्त्यावर ‘मोक्का’ लावलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून
तिच्यावर बलात्कार केला.तरुणी गर्भवती झाली. त्यानंतर डाॅ. गुंडने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. तरुणीचा गर्भपात झाल्यानंतर तिने विवाहाबाबत डाॅ. गुंडकडे विचारणा केली. तेव्हा डाॅ. गुंडने तिला धमकावले. मी विवाह करणार नाही. पोलिसांकडे तक्रार केल्यास आत्महत्या करण्याची धमकी देऊन डाॅ. गुंड पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक वर्षा घोगरे तपास करत आहेत.