पुणे : मटणाची उधारी न देता फसवणूक केल्याप्रकरणी लष्कर भागातील एका नामांकित हॉटेल मालकाविरुद्ध लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल व्यावसायिकाने ६१ लाखांची उधारी न देता फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. अफजल युसूफ बागवान (वय ६५, रा, कौसरगाब, कोंढवा), अहतेशाम अयाज बागवान (वय ३५) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> ससून रूग्णालयात आणखी एक घोटाळा : शिक्के चोरून बनविली बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रे

याबाबत शादाफ निजाम पटेल (वय ४३, रा. लष्कर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पटेल यांचा मटण विक्रीचा व्यवसाय आहे. बागवान यांचे लष्कर भागातील इस्ट स्ट्रीट परिसरात बागवान हॉटेल आहे. २०१९ पासून वेळोवेळी पटेल यांनी बागवान यांना मटणाचा पुरवठा केला. एकूण दोन कोटी ९१ लाख ८१ हजारांच्या मटणाचा पुरवठा केल्याचे पटले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यापैकी दोन कोटी ३० लाख १९ हजार रुपये पटेल यांना देण्यात आले. मात्र, उर्वरीत ६१ लाख ६२ हजार रुपये परत न करता फसवणूक केल्याचे पटले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक बनसोडे तपास करत आहेत.