पुणे : विमानात बाँम्ब ठेवल्याची अफवा पसरविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर विमानात बाँम्ब ठेवल्याची अफवा पसरिवणारा संदेश पुन्हा पाठविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सात विमानात बाँम्ब ठेवण्यात आल्याचा संदेश दोन खासगी विमान कंपन्यांना नुकतेच पाठविण्यात आले. बाॅम्बच्या अफवेमुळे परिणाम विमान वाहतूक सेवेवर झाला असून, प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत असल्याचे दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भोसरी विधानसभेतून महाविकास आघाडीकडून अजित गव्हाणे यांचा अर्ज दाखल; लांडगे विरुद्ध गव्हाणे असा सामना होणार

याबाबत श्रीकांत चंद्रशेखर वडगावकर (वय ३७) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ॲडम अलांझा १००० या नावाने समाज माध्यमात खाते वापरणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिगो एअरलाइन्सच्या गुरुग्राम येथील अधिकृत समाज माध्यमातील खात्यावर ॲडम अलांझा या नावाने संदेश पाठविण्यात आला. विमानात बाँम्ब ठेवण्यात आल्याची धमकी संदेशाद्वारे देण्यात आली. संबंधित संदेश आल्यानंतर पाटणा ते पुणे, बंगळुरु ते पुणे, कोलकात्ता ते पुणे या विमानांची तपासणी करण्यात आली. प्रवाशांना विमानातून उतरविण्यात आले. या संदेशामुळे विमान सेवेवर परिणाम झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे. अशाच प्रकारचा संदेश पाठविल्याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २००८ बाँम्बिंग या खात्यावरुन संदेश पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. विस्तारा एअरलाइन्स कंपनीची सिंगापूर ते पुणे, अकासा एअरलाइन्सचे कोलकात्ता ते पुणे, इंडिगो एअरलाइन्सचे पुणे ते जोधपूर, कोलकात्ता ते पुणे या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवा संदेशाद्वारे परविण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक करपे तपास करत आहेत.