पुणे : मराठा आरक्षणासाठी मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळ आंदोलन केल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी रवी पडवळ, प्रशांत पवार, निखिल पानसरे, योगेश दसवडकर, उमेश महाडिक, संतोष साठे, निखिल धुमाळ, समीर घाटे, अभिषेक भरम, विराज सोले यांच्यासह ४०० ते ५०० आंदोलकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नितीन खुटवड यांनी या संदर्भात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मराठा आंदोलनाला पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा पाठिंबा, कडकडीत बंद

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाकडून मंगळवारी (३१ ऑक्टोबर) दुपारी बाराच्या सुमारास वडगाव बुद्रुक परिसरातील नवले पुलाजवळ आंदोलन करण्यात आले . आंदोलनात ४०० ते ५०० कार्यकर्ते सहभागी झाले होते. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर आंदोलकांनी टायर पेटविल्याने वाहतूक ठप्प झाली. खेड-शिवापूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. शहरात जमावबंदीचा आदेश लागू असताना उल्लंघन केल्याप्रकरणी आंदोलकांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police registred fir against 500 people protesting near navle bridge for maratha reservation pune print news rbk 25 zws
Show comments