लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : शहराच्या वेगवेगळ्या भागातून गहाळ झालेले ४५६ मोबाइल संच पोलिसांनी तक्रारदारांना परत मिळवून दिले आहेत. पोलिसांना मोबाइल मिळवून दिल्याने तक्रारदारांनी आनंद व्यक्त केला.

हरवलेल्या मोबाइल संचाची तक्रार पुणे पोलिसांच्या लॉस्ट अँड फाऊंड पोर्टलवर स्वीकारण्यात येते. मोबाइल संच हरविल्यास त्याची प्रत या पोर्टलवरुन नागरिकांना उपलब्ध होते. मोबाइल संचाचा आयएमईआय क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येते. महिनाभरात मोबाइल हरविल्याच्या २३०० तक्रारी पोलिसाांकडे करण्यात आल्या होत्या. त्यापैकी ४५६ मोबाइलचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील हिरकणी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी समारंभात तक्रारदारांना मोबाइल परत करण्यात आले.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त अरविंद चावरिया, मनोज पाटील, शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यावेळी उपस्थित होते. सायबर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, राहुल शिंदे, किरण जमदाडे, संदीप कोळगे, प्रमोद टिळेकर आणि पथकाने तांत्रिक तपास करुन हरवलेल्या मोबाइल संचांचा शोध घेतला.