शिरूर : रस्त्यावरुन बुलेट चालवत सायलेन्सरचा मोठा आवाज व फटाके फोडणारे किंवा कर्कश आवाज करणारे बुलेट चे सायलेन्सर पोलीसांनी कारवाई करत  जप्त केले होते . अश्या ३५  सायलेन्सरची  रोड रोलर च्या मदतीने  विल्हेवाट लावण्यात आली असून यापुढे ही अशी कारवाई सुरुच राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले .

केंजळे म्हणाले  पोलीस स्टेशनचा वाहतूक शाखा मार्फत शिरूर शहरातील बुलेट मोटर सायकल वर वेळोवेळी कारवाई करून फटाके फोडणारे किंवा कर्कश आवाज करणारे बुलेट चे सायलेन्सर जमा करण्यात आले होते. या  सायलेन्सरची रोड  रोलर च्या मदतीने नवीन पोलीस स्टेशनचा इमारती समोर या सायलेन्सर वर रोड रोलर  फिरवून  विल्हेवाट लावण्यात  आली .

पोलीस अधीक्षक पकंज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढे  ही वाहतूकीला व रहदारीस शिस्त लावण्याकरीता कडक कारवाई करण्यात येणार आहे .रस्त्यावरुन बुलेट चालवत सायलेन्सरचा मोठा आवाज फटाके फोडणारे किंवा  कर्कश आवाज करणारे सायलेन्सरवर यापुढे ही अशीच कारवाई करण्याबरोबर अश्याप्रकारचे आवाज काढणा-या सायलेन्सरची विक्री करणा-या दुकानदारांना नोटीसा काढण्यात येणार आहे . त्याच बरोबर चारचाकी गाड्यांच्या काळ्या काचा करण्यारांच्या  विरोधात ही कारवाई सुरु करत असल्याचे केंजळे यांनी सांगितले .

दरम्यान रोड रोलर च्या खाली हे सायलेंसर  ठेवून विल्हेवाट लावली जात असताना कारवाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती .

Story img Loader