पुणे : शहरात कोयत्याचा वापर करून दहशत माजविण्याऱ्या गुंडांनी धुमाकूळ घातला असताना पोलिसांनी कोयते विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बोहरी आळीतील एका दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घालून दुकानातून विक्रीसाठी ठेवलेले १०५ कोयते जप्त केले.

आपल्या भागात भाईगिरी करण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले, तरुण कोयत्याचा वापर करून दहशत निर्माण करीत आहेत. भर रस्त्यावर गर्दीच्या वेळी कोयत्याने येणार्‍या जाणार्‍यांवर वार करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये कोयत्याचा वापर करण्यात आला आहे.

हेही वाचा – तरुण असे का वागतात? पुण्यात कोयता गॅंगच्या कहराच्या पार्श्वभूमीवर मानसोपचारतज्ज्ञांनी दिली ‘ही’ माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत पुण्यातील कोयत्या गँगचा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यानंतर पोलिसांनी कोयते विक्री करणार्‍या दुकानावर छापा टाकून १०५ कोयते जप्त केले.