जागा, मनुष्यबळ असतानाही राज्य सरकारच्या दिरंगाईचा फटका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी-चिंचवडमधील चिखली भागातील वाढती गुन्हेगारी आणि गेल्या काही वर्षांपासून या भागात येत असलेल्या परप्रांतीय कामगारांच्या वाढत्या लोंढय़ामुळे हा भाग पोलिसांच्या दृष्टीने ‘संवेदनशील’ झाला आहे. त्यामुळे तेथे स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी शासनाकडे पाठविला होता. तो प्रस्ताव मंजूरदेखील झाला आहे. पोलीस ठाण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, प्रस्तावित जागा अशा पायाभूत सुविधा देखील तयार आहेत. मात्र, शासनाने अद्याप अध्यादेश न काढल्याने स्वतंत्र चिखली पोलीस ठाण्याची निर्मिती रखडली आहे.

चिखली भागात भंगार व्यावसायिक तसेच लघुउद्योजकांचे व्यवसाय आहेत. पूर्वी हा भाग पुणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारित होता. दोन वर्षांपूर्वी चिखलीचा समावेश पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत करण्यात आला. हा भाग निगडी पोलीस ठाण्याला जोडण्यात आला आहे. निगडी पोलीस ठाण्याचा विस्तार मोठा आहे. चिखली भागातील गुंडांकडून उद्योजक, भंगार व्यावसायिकांना अनेकदा गुंडांकडून खंडणीसाठी धमकावण्याचे प्रकार घडतात. या भागातील वाढती गुन्हेगारी व मोठय़ा संख्येने वाढणारी परप्रांतीय कामगारांची वस्ती या देखील समस्या आहेत. त्यामुळे तेथे नवीन पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या गृह विभागाकडे पाठविण्यात आला होता. मात्र, शासनाने नव्या पोलीस ठाण्याचा अध्यादेश अद्याप न काढल्यामुळे चिखली पोलीस ठाणे कार्यान्वित होऊ शकलेले नाही.

या संदर्भात परिमंडल तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली यांनी सांगितले, निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या चिखली भागासाठी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या भागात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. निगडीपासून चिखली परिसर तसा लांब आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणी केली होती. चिखली पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. प्रस्ताव मंजूर झाला असून अध्यादेशाअभावी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती रखडली आहे. चिखली पोलीस ठाण्यासाठी जागादेखील पाहण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची चिखली भागात इमारत आहे. तेथे चिखली पोलीस ठाणे सुरू करण्याचे नियोजन आहे. पोलीस ठाण्यासाठी स्वतंत्र मनुष्यबळदेखील मंजूर झाले आहे.

चिखली पोलीस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला असून अद्याप अध्यादेश न आल्यामुळे चिखली पोलीस ठाण्याची निर्मिती होऊ शकलेली नाही. पायाभूत सुविधादेखील तयार आहेत. अध्यादेश आल्यानंतर तातडीने नवीन पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू करण्यात येईल.

– अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त (मुख्यालय- १)