पिंपरी : वर्षाखेरीस बंदोबस्त करून पहाटे घरी जात असताना एका पोलीस उपनिरीक्षकाचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे महाळुंगे येथे घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जितेंद्र गिरनार असे मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गिरनार हे महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. वर्षाखेरीस ते दिवस-रात्र बंदोबस्तासाठी तैनात होते. बुधवारी पहाटे बंदोबस्त संपवून ते घरी जात होते. महिंद्रा कंपनी समोरून ते मोटारीतून जात होते. समोर एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता मात्र, कंटेनर चालकाने अचानकपणे कंटेनर डाव्या लेनमध्ये घुसला. गिरनार यांच्या मोटारीची कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक बसली. या अपघातात गिरनार गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात हळहळ व्यक्त केली जाती आहे.

हेही वाचा >>>जलपर्णी काढायची कुणी? महापालिकेच्या आरोग्य अन् पर्यावरण विभागाचे एकमेकांकडे बोट

गिरनार मागील काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहेत. पूर्वी ते वाकड पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. त्यानंतर मागील काही महिन्यांपूर्वी त्यांची महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली होती.

दरम्यान, दिघी येथील साई मंदिर समोर मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेला एका वाहनाने धडक दिली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police sub inspector dies in accident while returning home from duty pune print news ggy 03 amy