सांगवी पोलीस ठाण्याच्या पोलिसांवर आता गुन्हेगार सोडून चक्क कुत्रा शोधण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पोलीस कर्मचारी सीसीटीव्हीची मदत घेत आहे. ही घटना नवी सांगवी पोलीस चौकीच्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी कुत्र्याच्या मालकिणीने सांगवी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार नोंदवली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुन्हेगाराच्या मागावर असणाऱ्या पोलिसांना वेगवेगळ्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी रात्री उशिरा नवी सांगवी पोलीस चौकीच्या परिसरातील एका घरातून लॅब्राडोर जातीचा कुत्रा चोरांनी पळवून नेला आहे. याप्रकरणी या कुत्र्याची मालकीणीने सांगवी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यामुळे गुन्हेगार सोडून पोलिसांना कुत्रा शोधण्याची वेळ आल्याची चर्चा पोलीस ठाण्यात सुरू आहे. या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी परिसरातील चौकाचौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

कुत्र्याच्या वर्णनानुसार तपकिरी रंगाचा हा कुत्रा असून त्याचे वय चार वर्षे आहे. तक्रारदार महिलेच्या कुटुंबाला या कुत्र्याचा जास्तच लळा लागलेला असून अनेक वेळा संबंधीत महिलेने पोलीस ठाण्यात आपला लाडका कुत्रा मिळाला की नाही याची विचारण्यासाठी खेटे घालत होती. मात्र, कुत्रा काही पोलिसांना सापडत नव्हता. त्यामुळे कुत्रा मिळालाच नाही तर पोलिसांना विशेष टीम करून कुत्र्याला शोधण्याची वेळ आली तर नवल वाटायला नको.

विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी सांगवी पोलीस ठाण्यात एक कुत्रा असाच भटकत आला होता. तो तीन दिवस पोलीस ठाण्यातच ठाण मांडून होता. अखेर कुत्रा चोरीला गेल्याची तक्रार दाखल करायला त्याचा मालक पोलीस ठाण्यात आला त्यावेळी दोघांची भेट झाली होती आणि कुत्रा सुखरूप मालकपर्यंत पोहचला होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police tired of finding a lost dog
Show comments