‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या बोध वाक्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पेलणाऱ्या पोलिसांनी नागरिकांना वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला. राज्यभरात १ जुलै ते ७ जुलै या दरम्यान वृक्ष लागवडीचा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत पिंपरी चिंचवड येथील झोन ३ मधील एकुण नऊ पोलीस स्थानकात झाडे लावण्यात आली. या उपक्रमात पोलीस अधिकाऱ्यांनी देखील सहभाग घेतला. विशेष म्हणजे तब्बल ५०० हून अधिक झाडांची रोपांची लागवड करण्यात  लावण्यात आली.  त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार आहे.

पोलीस स्थानकाच्या परिसरात नेहमीच नवचैतन्य निर्माण होण्यास मदत होईल. तसेच परिसरात निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा आनंदही मिळेल, अशी प्रतिक्रिया पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलिसांसाठी प्रत्येक दिवस हा गुन्हेगारी क्षेत्रातील आरोपीना पकडण्यात जातो. मात्र आज पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी झाडे लावून एक नवीन पायंडा रोवला.त्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच म्हणावे लागेल. या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर रोपे जगवून त्याचे झाडात रुपांतर झाल्यावर खऱ्या अर्थाने हा उपक्रम सफल होईल.
पिंपरी, चिंचवड, निगडी,भोसरी , भोसरी एम.आय.डी.सी., सांगवी,हिंजवडी, वाकड या ठिकाणी आज वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला.

 

Story img Loader