लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पिंपरी : न्यायालयाच्या आदेशाने घराचा ताबा घेण्यासाठी आलेल्या वकील, फायनान्स कंपनीचे अधिकारी, पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना दापोडी येथे घडली.

याप्रकरणी अनिल भुंडाराम चौधरी (२५), कमला अनिल चौधरी (वय २८), भुंडाराम जोधाराम चौधरी (वय ४९), पालीदेवी भुंडाराम चौधरी (वय ४०, चौघे रा. दापोडी), मकरंद शंकरदेव (वय ४८, रा. कात्रज) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल व्यंकटराव मनाळे (वय २९, रा. पुणे) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आणखी वाचा-पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशांसाठीच्या ‘सीयूईटी’ परीक्षेत काही महत्त्वपूर्ण बदल… आता होणार काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांच्या घराचे हप्ते थकल्याने एका फायनान्स कंपनीने न्यायालयाकडून घराचा ताबा घेण्याचा आदेश घेतला. त्यानुसार कंपनीचे वकील मनाळे, अधिकारी, पोलीस हे कॅमेऱ्याच्या निगराणीत ताबा घेण्याची कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी मनाळे आणि पोलिसांच्या अंगावर धावून येत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मनाळे यांच्या सोबत बाचाबाची करून मारहाण केली. पोलिसांना धक्काबुक्की केली. दापोडी पोलीस तपास करीत आहेत.