पुणे : मध्यरात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या चायनीज खाद्यपदार्थांची गाडी पोलिसांनी बंद केल्यानंतर जेवण न मिळाल्याने एकाने चाकूने पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला केला. हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. लोहगाव परिसरात पहाटे ही घटना घडली. पोलीस नाईक सचिन उत्तम जगदाळे (वय ३८) असे गंभीर जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी महानंदेश्वर उर्फ मल्या महादेव बताले (वय २४, रा. नळदुर्ग, जि. उस्मानाबाद) याला अटक करण्यात आली आहे. खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – शरद पवारांनी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना लावला फोन; म्हणाले, “विद्यार्थ्यांमधील काही प्रतिनिधी आणि मी..”

हेही वाचा – “ज्या माणसाची स्वतःच्या जिल्ह्यातून..” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर शरद पवारांचा टोला

पोलीस नाईक सचिन जगदाळे रात्रगस्तीवर होते. लोहगाव परिसरातील धानोरी नाका येथील समायरा चायनिज सेंटर मध्यरात्री अडीच वाजता सुरू होते. पोलीस कर्मचारी सचिन आणि सहकाऱ्यांनी चायनीज सेंटर बंद केले. त्या वेळी महानंदेश्वर तेथे जेवण करण्यासाठी आला होता. सेंटर बंद केल्याने त्याला जेवण मिळाले नाही. त्यामुळे, चिडलेल्या महानंदेश्वर याने चायनीज सेंटरमधील चाकू घेऊन सचिन यांच्यावर हल्ला केला. सचिन यांच्यावर गालावर चाकूने वार केल्याने त्यांना गंभीर दुखापत ‌झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. महानंदेश्वर याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.