पुणे : स्वारगेट पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्योती कैलास बर्डे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. कैलास बर्डे शहर पोलीस दलात नियुक्तीस आहेत. बर्डे दाम्पत्य स्वारगेट पोलीस वसाहतीत राहायला आहेत. शुक्रवारी दुपारी ज्योती आणि त्यांचा भाऊ घरी होता. ज्योती यांनी दुपारी अडीचच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्योती यांच्या भावाच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

हेही वाचा…पुणे : कल्याणीनगर भागांतील हॉटेलमध्ये धांगडधिंगा, हॉटेल मालकांवर गुन्हे

u

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा ज्योती यांनी आात्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली नसल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा…पिंपरी: आम्ही इथले भाई; आमच्यासोबत भिडण्याची कुणाची हिंमत नाही, अन्यथा…३०२

कोथरुड भागात तरुणीची आत्महत्या

कोथरुड भागातील श्रीराम काॅलनी परिसरात १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policemans wife committed suicide by hanging herself in swargate police colony on friday pune print news rbk 25 sud 02