लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : शहराच्या राजकारणात पवार कुटुंबातील तिसऱ्या पिढीने लक्ष घातले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पुत्र पार्थ यांनी शहराचा समावेश असलेल्या मावळमधून लोकसभेची निवडणूक लढविल्यानंतर शहराच्या राजकारणात लक्ष घातले होते. आता पक्षातील फुटीनंतर पार्थ यांचे चुलत बंधू, आमदार रोहित पवार यांनीही शहराच्या राजकारणात प्रवेश केला आहे. त्यामुळे भविष्यात पवार कुटुंबातील दोन भावांमधील राजकीय संघर्ष पिंपरी-चिंचवडकरांना पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Gujarat man, presumed dead, walks into his own memorial service shocking news goes viral
बापरे! कुटुंबाने अंत्यसंस्कार उरकले अन् पुढच्याच क्षणी शोकसभेत मुलगा जिवंत डोळ्यासमोर उभा; नेमकं काय घडलं?
Rakesh Mutha hair burnt in kalyan west
कार्यकर्त्यांचा अतिउत्साह उमेदवाराच्या अंगलट आला; फटाक्यांच्या ठिणगीमुळे उमेदवाराचे केस जळाले
Former Shiv Sena MLA Mahadev Babar announced support for independent candidate Gangadhar Badhe
हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर यांचा मोठा निर्णय ! महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांंच्या अडचणी वाढल्या
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Maharashtra Elections Assembly Elections 2024 Election Commission
महाराष्ट्र वाहून जाणार की आपली वेगळी वाट आखणार?

पालिकेवर राष्ट्रवादीची १५ वर्षे सत्ता होती. बारामतीनंतर राष्ट्रवादीचा म्हणजेच अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून शहराकडे पाहिले जाते. शहराच्या राजकारणात त्यांच्याशिवाय पक्षातील कोणालाही लक्ष घालण्यास अघोषित मनाई होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होते. त्यांच्या भीतीमुळे पक्षाचे मोठे नेते शहरात फिरकत नव्हते. बारामती लोकसभा मतदारसंघात येत असलेला ताथवडे हा भाग शहरात असतानाही खासदार सुप्रिया सुळे पालिकेत येत नसत.

आणखी वाचा-वाहन परवाने, ‘आरसी’ मिळण्यास विलंब… पुणेकरांनी पाठवले सेवा हमी आयुक्तांना ‘हे’ पत्र

अजित पवार यांच्यानंतर त्यांचे पुत्र पार्थ यांनी २०१९ पासून शहराच्या राजकारणात लक्ष घातले. महाविकास आघाडीचे सरकार असताना ते नगरसेवकांच्या बैठका, त्यांच्या कामासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा, प्रभागनिहाय आढावा घेत होते. मात्र, रोहित पवार हे शहरात फिरकत नव्हते. निवडणुकांदरम्यान केवळ प्रचारासाठी येत होते. आता पक्ष फुटीनंतर रोहित हे सक्रिय झाले आहेत.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी शहरात येत दुचाकी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. अजित पवार यांना रोखण्यासाठी शहरात आलो नसल्याचे सांगितले तरी शहराचा विकास हा शरद पवार यांच्यामुळे झाल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. संघटना म्हणून मोठी ताकद लावणार आहे. पक्षाचे नेते, सुप्रिया सुळेही शहरात येतील असे सांगत त्यांनी नेत्यांवरील शहरातील अघोषित बंदी उठल्याचे स्पष्ट केले. गणपतीच्या आरतींसाठी ते शहरात येत आहेत.

आणखी वाचा-पुणे महापालिकेकडून वैशाली हॉटेलवर हातोडा

रोहित आणि पार्थ यांची सुरुवातीपासून राजकीय तुलना होते. त्यांच्यात सुप्त संघर्ष असल्याचेही बोलले जाते पण, रोहित यांनी प्रत्येकवेळी या चर्चा फेटाळून लावल्या. आता पक्षातील फुटीनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय संघर्ष होण्याची शक्यता आहे. राज्याला काका-पुतणे यांच्या संघर्षाचा वारसा असताना आता भावा-भावांमध्ये राजकीय संघर्ष होईल असे दिसते. त्याची सुरुवात पिंपरी-चिंचवडमधून होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.