पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे ११ हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. राज्याचे या पोटनिवडणुकडे लक्ष लागले होते. फडणवीस-भाजपाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहाय्याने पूर्ण ताकद यासाठी लावली होती. महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनीही जोरदार प्रचार केला होता. असं असतांना मतमोजणीत सुरुवातीपासून आघाडीवर राहत रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभव केला.

धंगेकर यांची राजकीय वाटचाल

रविंद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक असून १९९७ ते २००२ मध्ये त्यांची बहीण वंदना धंगेकर आणि त्यानंतर २००२ ते २०२२ पर्यंत रविंद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेमध्ये सलग चार वेळा प्रचंड मतांनी ते निवडून येत होते.

dhananjay munde valmik karad
Dhananjay Munde: “हे घ्या धनंजय मुंडे-वाल्मिक कराड यांच्यातील संबंधाचे धडधडीत पुरावे”, अंजली दमानियांनी सातबारेच केले शेअर!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Bihar assembly elections will be held under the leadership of Nitish Kumar Modi Information from Deputy Chief Minister Samrat Chaudhary
बिहार विधानसभा निवडणूक नितीशकुमार-मोदींच्या नेतृत्वातच; उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची माहिती
Chhagan Bhujbal On Ajit Pawar
Chhagan Bhujbal : “मग मला निवडणूक लढायला सांगायचं नव्हतं ना?”, छगन भुजबळांचा थेट अजित पवारांना सवाल
Chandrakant Patil On Pune Guardian Minister
Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”
Image of P P Chaudhary
One Nation One Election : तीन वेळा खासदार व RSS ची पार्श्वभूमी असलेले संसदीय समितीचे अध्यक्ष पी. पी. चौधरी कोण आहेत?
Sandeep Dikshit on Delhi Elections 2025 Arvind Kejriwal
“दिल्लीच्या निवडणुकीत आप जिंकली तरी केजरीवाल मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत”, काँग्रेसचा दावा; कारण सांगत म्हणाले…

हेही वाचा… Kasba Chinchwad Bypoll Election Result Live: “…जर कसबा या भ्रमातून बाहेर पडू शकत असेल …”, निकालावर उद्धव ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

२००२ ला रविंद्र धंगेकर हे शिवसेनेच्या तिकीटावर पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले.

हेही वाचा… Kasba By Poll Result 2023: “निवडून येणारे उमेदवार दिले तर मविआ राज्याच्या निवडणुकीतही जिंकेल” -अजित पवार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर,रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत राज ठाकरे यांना साथ देत मनसेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या २००७ आणि २०१२ या दोन्ही पुणे पालिका निवडणुकीत धंगेकर हे मनसेच्या तिकिटावर प्रचंड मतांनी निवडून आले.

हेही वाचा… Kasba Bypoll Election 2023: कसबा आमदार रवींद्र धंगेकर फक्त आठवी पास! जाणून घ्या त्यांची एकूण संपत्ती

त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत काँग्रेस पुरस्कृत म्हणून पालिकेची निवडणूक लढवली आणि त्याही निवडणुकीत ते प्रचंड मतांनी निवडून आले. त्या निवडणुकीत भाजपचे नेते गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. ही निवडणुक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. देवेंद्र फडणवीस यांचे अंत्यत विश्वासू सहकारी म्हणून गणेश बिडकर यांची ओळख होती.

हेही वाचा… Kasba Bypoll Result 2023 : रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कसब्यातील परीवर्तन…”

एवढंच नाही तर रविंद्र धंगेकर यांनी २००९ आणि २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुक लढवली होती. त्यावेळी भाजपचे तत्कालीन आमदार गिरीश बापट यांना चांगली लढत दिली होती.

Story img Loader