कट्टर शिवसैनिक ते काँग्रेस…रविंद्र धंगेकर यांचा आत्तापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता? ( छायाचित्र – सागर कासार )
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर हे ११ हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले आहेत. राज्याचे या पोटनिवडणुकडे लक्ष लागले होते. फडणवीस-भाजपाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहाय्याने पूर्ण ताकद यासाठी लावली होती. महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांनीही जोरदार प्रचार केला होता. असं असतांना मतमोजणीत सुरुवातीपासून आघाडीवर राहत रविंद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पराभव केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
रविंद्र धंगेकर हे मूळचे शिवसैनिक असून १९९७ ते २००२ मध्ये त्यांची बहीण वंदना धंगेकर आणि त्यानंतर २००२ ते २०२२ पर्यंत रविंद्र धंगेकर हे विविध पक्षांच्या तिकिटावर पुणे महानगरपालिकेमध्ये सलग चार वेळा प्रचंड मतांनी ते निवडून येत होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर,रविंद्र धंगेकर यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत राज ठाकरे यांना साथ देत मनसेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या २००७ आणि २०१२ या दोन्ही पुणे पालिका निवडणुकीत धंगेकर हे मनसेच्या तिकिटावर प्रचंड मतांनी निवडून आले.
त्यानंतर रविंद्र धंगेकर यांनी २०१७ ला राज ठाकरे यांची साथ सोडत काँग्रेस पुरस्कृत म्हणून पालिकेची निवडणूक लढवली आणि त्याही निवडणुकीत ते प्रचंड मतांनी निवडून आले. त्या निवडणुकीत भाजपचे नेते गणेश बिडकर यांचा पराभव केला होता. ही निवडणुक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली होती. देवेंद्र फडणवीस यांचे अंत्यत विश्वासू सहकारी म्हणून गणेश बिडकर यांची ओळख होती.
एवढंच नाही तर रविंद्र धंगेकर यांनी २००९ आणि २०१४ ला मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुक लढवली होती. त्यावेळी भाजपचे तत्कालीन आमदार गिरीश बापट यांना चांगली लढत दिली होती.
धंगेकर यांची राजकीय वाटचाल