धर्मांतर, गोहत्या आणि लव्ह जिहाद यासाठी कडक कायदे करावेत आणि त्यांची कठोर अंमलबजावणी करावी, छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस ‘धर्मवीर दिन’ म्हणून साजरा करावा या मागण्यांसाठी विविध संघटनांच्या वतीने रविवारी (२२ जानेवारी) हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> “बेळगाव देऊन टाका आणि प्रश्न संपवा”, पुण्यातील कार्यक्रमात शरद पवारांचं मिश्किल विधान

रविवारी सकाळी दहा वाजता लाल महाल येथून मोर्चाला सुरूवात होईल. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून लक्ष्मी रस्त्याने हा मोर्चा डेक्कन परिसरातील संभाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पोहोचेल आणि या ठिकाणी समारोप होणार आहे. आमदार शिवेंद्र राजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजा भैया, संत श्री तुकाराम महाराज यांचे वंशज शिवाजीराव मोरे, शिरीष मोरे, धनंजय देसाई हे मान्यवर मोर्चात सहभागी होणार आहेत. तसेच शहरातील राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना, व्यापारी, गणेशोत्सव मंडळे मोर्चात सहभागी होणार आहेत, अशी माहिती पतित पावन संघटनेचे स्वप्निल नाईक यांनी पत्रकार परिषदेत दिली. विश्व हिंदू परिषदचे किशोर चव्हाण, इतिहास अभ्यासक नीलेश भिसे, राजे शिवराय प्रतिष्ठानचे महेश पवळे या वेळी उपस्थित होते.

Story img Loader