राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे. नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि त्यावरील प्रतिक्रिया चिंताजनक आहेत. याबाबत राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काही आचारसंहिता तयार करता येईल का, याचा विचार करावा, अशी सूचना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली. केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात अब्दुल सत्तार यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा- पुणे: कुष्ठरोग निर्मूलनाचा दावा फोल; १४ वर्षांखालील मुलांमध्ये नव्याने संसर्ग
पाटील म्हणाले, अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या विधानासाठी माफीचा आग्रह धरला. सत्तार यांनी माफी मागितली आहे. पण माफी मागितल्यावर, दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यावरील गदारोळ संपायला हवा. लोकांना अशा प्रकारची विधाने अजिबात आवडत नाहीत, याचा नेत्यांनी विचार करावा. लोकांना नेत्यांनी विकासावर बोलायला हवे आहे.
हेही वाचा- औद्योगिक धोरणांमध्ये बदल करण्याची राज्य सरकारची तयारी; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आश्वासन
‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणाऱ्यांनी दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये’, असा टोला पाटील यांनी लगावला. ‘हर हर महादेव’ चित्रपटाला होणाऱ्या विरोधावर भाष्य करताना पाटील यांनी ‘मी अजून चित्रपट पाहिला नाही’, असे सांगितले. मात्र, विरोध करणारे प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावून कसे लावतात? चित्रपटागृहाबाहेर त्यांनी पाट्या घेऊन उभे राहावे. विरोध करण्यासाठी उपलब्ध कायदेशीर मार्गाचा वापर केला जावा, अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या आहेत
शिवसेना पहिल्यांदाच फुटली का?
अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे समर्थन करणार नाही. पण खोके हा विषय कसा सुरू झाला?, असा सवाल करून पाटील यांनी ते देखील लोकांना आवडत नाही, असे सांगितले. शिवसेना यापूर्वी फुटली नव्हती का? नारायण राणे, छगन भुजबळ यांना कोणी फोडले? त्यावेळी खोके नसतील, पेट्या होत्या. त्यामुळे एकांगी आरोप करायला नको. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पक्षात घुसमट होत होती, त्यातून ते बाहेर पडले हे वास्तव आहे. त्यामुळे हे आरोप बंद व्हायला हवेत.