ताथवडे विकास आराखडय़ावरून पिंपरीत चांगलेच ‘अर्थ’ कारण रंगले असून याच विषयावरून सोमवारी शिवसेनेतील गटबाजीचे राजकारण उफाळून आले. आरक्षणांमध्ये तब्बल १७४ कोटी रुपये किमतीच्या जागांवर टाकलेल्या आरक्षणांमध्ये राष्ट्रवादीने अर्थपूर्ण फेरबदल केल्याचा आरोप शिवसेनेने केला. तर, शिवसेनेचे नेते खोटारडे असून त्यांच्याही नेत्यांनी फेरबदल करून घेतल्याचा पलटवार राष्ट्रवादीने प्रत्युत्तरात केला आहे.
ताथवडे विकास आराखडय़ात नियोजन समितीने बिल्डरधार्जिणे बदल केले असून त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी संपर्कप्रमुख गजानन कीर्तिकर व खासदार शिवाजीराव आढळराव यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी गटनेते श्रीरंग बारणे, नगरसेविका सुलभा उबाळे, सीमा सावळे, आशा शेंडगे आदी उपस्थित होते. या वेळी कीर्तिकर म्हणाले, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, िपपरी-चिंचवड या शहरांमध्ये नव्याने समविष्ट होणाऱ्या गावातील जमिनी विकत घेऊन आरक्षणे वगळण्याचा धंदा संगनमताने सुरू होतो. ताथवडय़ाच्या बाबतीतच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असेच उद्योग केले आहेत. प्रशासनाने चुकीची आरक्षणे टाकली. तर, नियोजन समितीच्या सदस्यांनी थेट बाजारभाव फोडला होता. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी. शिवसेना विधिमंडळात पाठपुरावा करेल, वेळप्रसंगी रस्त्यावर उतरेल. आढळराव म्हणाले, अर्थपूर्ण व्यवहारासाठीच पालिका सभेत ताथवडय़ाचा विषय तहकूब ठेवण्यात आला. आराखडय़ात वादग्रस्त शिफारशी असून त्या जागांची मालकी बांधकाम व्यावसायिकांची आहे. आरक्षण टाकण्याच्या धमक्या शेतक ऱ्यांना देण्यात आल्या आहेत. बिल्डरधार्जिण्या शिफारशी वगळून आराखडय़ास मंजुरी द्यावी.
यासंदर्भात, नियोजन समितीचे सदस्य नवनाथ जगताप म्हणाले, शिवसेनेचे नेते खोट बोलत आहेत. सव्र्हे क्रमांक ११४ मध्ये श्रीरंग बारणे यांच्या जागेवर आरक्षण होते, ते वगळण्यात आले, त्याबद्दल सेना नेते अवाक्षर काढत नाहीत. वास्तविक बारणेंनी घेतलेली हरकत योग्य होती. शिवसेनेतील गटबाजीमुळे उबाळे यांनी हे प्रकरण काढले आहे. सावळे यांनी घेतलेल्या हरकती योग्य होत्या. त्यानुसारही बदल करण्यात आले. हरकती घेतल्या जात होत्या, तेव्हा आढळराव, उबाळे कुठे होते, केवळ पैशासाठी आणि श्रेय घेण्यासाठी ते आरोप करत आहेत, याकडे जगताप यांनी लक्ष वेधले
अजितदादा फक्त ‘गर’ खातात!
ताथवडय़ाच्या विकास आराखडय़ातील घोटाळ्यात ‘कारभारी’ अजित पवार यांचा हात आहे का, अशी विचारणा केली असता, अजितदादांवर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यामुळे एवढय़ा छोटय़ा घोटाळ्यात त्यांचा सहभाग नसेल. कारण, ते साली खात नाहीत, फक्त गर खातात, असे विधान गजानन कीर्तिकर यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा