पिंपरी : घारापुरी येथील लेणी पाहण्यासाठी पर्यटक मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियावरुन बोटीने प्रवास करुन पोहोचतात. मात्र मतदान कर्मचाऱ्यांचा समुद्र प्रवास झाला तो लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पाडण्यासाठी..! घारापुरी येथील मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांनी बोटीतून प्रवास केला.

मावळ लोकसभा मतदारसंघासाठी उद्या सोमवार १३ मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणाहून रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. मतदानासाठी आवश्यक असणारे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच मतदान प्रक्रीया पार पाडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य यावेळी पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही करण्यात आली होती.

Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
nada update on hima das suspension creates confusion
हिमा दासच्या निलंबन कालावधीवरून गोंधळ
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
Public Works Minister Shivendra Raje, Satara Shivendra Raje,
साताऱ्यातील आम्ही चारही मंत्री एकत्रितपणे जिल्ह्याचा विकास करू, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजेंचा विश्वास

हेही वाचा…मावळमध्ये उद्या मतदान; किती मतदार बजावणार मतदानाचा हक्क?

या लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात उरण विधानसभा मतदार संघ येतो. उरण मतदारसंघातील मतदान केंद्रांसाठी मतदान साहित्याचे वितरण जसई येथील डी.बी पाटील मंगल कार्यालयातून करण्यात आले. यामधील ५८ क्रमांकाचे घारापुरी मतदान केंद्र आहे. अरबी समुद्रातील बेटावरील हे मतदान केंद्र असून तेथे ३८९ पुरूष आणि ४२० महिला असे एकूण ८०९ मतदार वास्तव्य करतात.

हेही वाचा…करोनाच्या नवीन उपप्रकाराचा पुण्यात शिरकाव; राज्यात रुग्णसंख्या किती?

या मतदान केंद्रासाठी स्वतंत्र क्षेत्रीय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. १ मतदान केंद्राध्यक्ष, २ मतदान अधिकारी, १ मतदान सहाय्यक यांनी आज उरण मधून मतदानाचे साहित्य ताब्यात घेतले. सोबत पोलीस बंदोबस्त घेऊन मतदान कर्मचाऱ्यांचे हे पथक आधी जीपने जेएनपीटी बंदरापर्यंत आले आणि तेथून थेट बोटीने मतदान साहित्य घेऊन घारापुरीतल्या या मतदान केंद्रावर पोहोचले.

Story img Loader