पुण्याजवळील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात पाणवठय़ावरील पाणी प्यायल्याने
सुपे अभयारण्य हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात असून, ते चिंकारा, तसेच गवताळ प्रदेशातील प्राणी आणि पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. या अभयारण्यातील पाडवी गावात ‘५६ मंदिरांचा ओढा’ या नावाने एक वाहता ओढा आहे. या ओढय़ाच्या ठिकाणी पाणी प्रदूषित असल्याचे आणि त्याच्या जवळपास अनेक पक्षी मरून पडल्याचे शुक्रवारी पाहायला मिळाले. या घटनेची माहिती मिळताच काही वन्यजीव अभ्यासकांनी त्या ठिकाणाला भेट दिली. त्यांनी केलेल्या पाहणीत चिखल्या (कॉमन सँडपायपर), पिवळय़ा चोचीच्या तसेच लाल चोचीच्या टिटव्या मरून पडल्याचे दिसले. अनेक पक्षी पाण्यातच मरून पडले होते. याशिवाय पाण्यातील बेडकांची पिले मेली होती आणि त्या पाण्यातील शेवाळे जळून त्याचा तवंग पाण्यावर जमा झाला होता.
या ठिकाणाची पाहणी केलेले पक्षितज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले की, या
मयूरेश्वर अभयारण्यात दूषित पाण्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू!
पुण्याजवळील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात पाणवठय़ावरील पाणी प्यायल्याने अनेक पक्ष्यांचा मृत्यू झाला, तर चिंकारासह विविध वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-10-2013 at 07:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Polluted water kills birds in mayureshwar sanctuary