पिंपरी : आळंदी येथील इंद्रायणी नदीतील पाण्यावर जलप्रदूषणामुळे पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात तवंग (फेस) आले आहेत. मागील सलग तीन दिवसांपासून नदीतील पाण्यावर मोठ्या प्रमाणात तवंग येत आहेत. त्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या इंद्रायणीचे पावित्र्य धोक्यात आले आहे. दरम्यान, नदी काठच्या गावांवर प्रशासनाने तातडीने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंद्रायणी नदीचा उगम हा लोणावळा परिसरातून झाला. ही नदी अनेक गावे, शहर पार करत आळंदीतून पुढे वाहत जाते. मात्र पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक वसाहती, इंद्रायणी नदीकाठच्या कारखान्यातील रसायनयुक्त पाणी, गावांमधील मैलायुक्त पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी नदी पात्रात सोडले जाते. मैलायुक्त पाणी हे इंद्रायणी नदीला प्रदूषित करत आहे. पिंपरी महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), जिल्हा प्रशासन, ग्रामस्थांच्या पुढाकारातून नदी काठच्या गावांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याचे नियोजन केले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आळंदीत पाण्यावर तवंग येत आहेत. एखाद्या अती थंड प्रदेशात ज्याप्रमाणे नदीवर बर्फाची चादर असते तशीच अवस्था इंद्रायणी नदीची झाली आहे.

इंद्रायणी नदी पात्रात लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करून माऊलींचे दर्शन घेतात. परंतु नदीची अवस्था बघता लाखो वारकऱ्यांचे आणि आळंदीतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आधीच जलपर्णीने इंद्रायणीचा श्वास गुदमरत आहे. आता त्यात जलप्रदूषणाची भर पडली असून अवघ्या नदी पात्रात तवंग दिसत आहे. रसायनयुक्त पाणी सोडल्यानेच नदीची अशी अवस्था झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : इंद्रायणी, पवना घेणार मोकळा श्वास… घेतला ‘हा’ मोठा निर्णय

आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले की, पिंपरी महापालिका क्षेत्रातून पाणी येते. चिखली, कुदळवाडी परिसरात नदीत पोहोचेपर्यंत विविध कारणांमुळे पाणी प्रदूषित होते. याठिकाणी मोठा बंधारा आहे. नदीचे पाणी त्यातून खाली येते तेव्हा पाण्यावर तवंग येतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही इतर प्राधिकरणांशी समन्वय साधत आहोत.