परस्पर रक्कम हडपण्याचे प्रकार; गावेही बनावट असल्याचे स्पष्ट

दत्ता जाधव

पुणे : एका गावात मूळ शेतकऱ्याला अंधारात ठेवून परस्पर भाडेकरार करून डाळिंब पिकाचा विमा काढला. विमा कंपनीला संशय आल्यावर पडताळणी केली असता त्या गावात डाळिंबाची बागच काय, एक झाडही नसल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला. पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि जालना जिल्ह्यात असे प्रकार घडले आहेत.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
rare ornate flying snake found in Sahyadri
सावंतवाडी: सह्याद्रीच्या पट्ट्यात घोटगेवाडी येथे दुर्मिळ उडता सोनसर्प आढळला
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
tigress Bijli walking with three cubs
Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…
explosion in bhugaon steel company in wardha
Video : भूगांव येथील पोलाद प्रकल्पात स्फ़ोट, २१ कामगार जखमी

राख (ता. पुरंदर, जि. पुणे) या गावातील ६४ शेतकऱ्यांनी डाळिंब पिकाचा विमा काढला होता. प्रत्यक्षात पडताळणी केली असता गावातील फक्त दोन शेतकऱ्यांकडे डाळिंबाची बाग असल्याचे स्पष्ट झाले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळिंबाचा विमा काढला होता. प्रत्यक्षात डाळिंबाचे एक झाडही दिसले नाही. सातारा जिल्ह्यात प्रत्यक्षात २९९६.९१ हेक्टरवर डाळिंब आहे, पण ४८०६.५१ हेक्टरवरील डाळिंब पिकाचा विमा काढण्यात आला आहे. साताऱ्यात १८०९.६० हेक्टर क्षेत्रावरील डाळिंबाचा बोगस विमा काढून रक्कम हडप करण्याचा डाव उघड झाला आहे. सांगलीत ५०८१.६० तर जालन्यात २७२१९.४६ हेक्टरवरील डाळिंब पिकाचा बोगस विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्व प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी आणि चौकशी सुरू झाली आहे.

तंत्रज्ञानाचा गैरफायदा
पीकविमा काढण्यासाठी ऑनलाइन सातबारा ग्राह्य धरण्यात येतो. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रमाची बचत होते. विमा काढताना संबंधित शेतीचे जिओ टॅगिंग असलेले छायाचित्रही जोडणे आवश्यक असते. पण पीकविमा काढणारी टोळी अन्य ठिकाणच्या शेतीचे छायाचित्र जोडते.

बनावट भाडेकरारपत्र
अनेक ठिकाणी बोगस भाडेकरारपत्र जोडण्यात येते. त्यामुळे मूळ शेतकऱ्याला आपल्या शेतावर कुणी विमा काढला आहे, याची माहितीही होत नाही. विमा रक्कम हडप करणारी टोळी परस्पर रक्कम भरते आणि आपल्या बँक खात्याचा नंबर देऊन विम्याची रक्कम परस्पर आपल्या खात्यात वळती करून घेते, असेही प्रकार घडल्याची माहिती राज्याचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे यांनी दिली.शेतकऱ्यांनी फळपिके आणि अन्य खरीप, रब्बी पिकांवरच विमा काढला पाहिजे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर परस्परच विमा काढला गेल्याचे प्रकार घडले आहेत. कृषी विभाग याबाबत अधिक माहिती संकलित करीत आहे. -बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक अधिकारी, सोलापूर