पुणे : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी छळ केल्याची तक्रार केली असून, वाशिम पोलिसांकडून हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी आता पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणात पूजा खेडकर यांनी पुण्यात येऊन जबाब नोंदवावा, असे समन्स पोलिसांनी बजावले होते. मात्र, खेडकर पुण्यात जबाब नोंदविण्यास उपस्थित न राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे छळ झाल्याची तक्रार दिली आहे. हा प्रकार पुण्यातील असल्यामुळे पुढील चौकशीसाठी हे प्रकरण पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यासाठी वाशिम पोलिसांचे पथक पुण्यात दाखल झाले. आता याबाबतची चौकशी पुणे पोलीस करणार आहेत. याप्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे. खेडकर यांनी पुण्यात येऊन पोलिसांकडे जबाब नोंदवावा, असे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र, खेडकर समन्स बजाविल्यानंतर उपस्थित न राहिल्याने त्यांना पुन्हा समन्स बजाविण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हे ही वाचा… पिंपरी-चिंचवड: हवेत पिस्तूल उंचावून रिल्स बनवणाऱ्यांना बेड्या; स्टंटबाजी करणं पडलं महागात

खेडकर यांची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. या कालावधीत दिवसे यांनी छळ केल्याचा आरोप खेडकर यांनी केला आहे. खेडकर यांची वाशिम पोलिसांनी नुकतीच चौकशी केली. खेडकर यांनी नोंदविलेल्या जबाबात जिल्हाधिकारी दिवसे यांनी छळवणूक केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील असल्यामुळे ही तक्रार वाशिम पोलिसांनी पुणे पोलिसांकडे वर्ग केली.

हे ही वाचा… महापालिका आयुक्तच डेंग्यूसदृश रोगाने आजारी पडतात तेव्हा…

प्रशिणार्थी असताना खेडकर यांनी खासगी आलिशान मोटारीला अंबर दिवा लावला. मोटारीवर महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली. त्यांनी बैठकीसाठी स्वतंत्र दालन,घेतले, तसेच शिपाईही घेतले. प्रशिक्षणार्थी खेडेकर यांच्या बडेजावपणाचे प्रकार उघडकीस आले. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालायील अधिकाऱ्यांनी तक्रार केली. खेडकर प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकारी दिवसे यांनी राज्य सरकारकडे पाठविला. त्यानंतर खेडकर यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. खेडकर यांनी दिवसे यांच्याविरोधात छळवणूक केल्याची तक्रार वाशिम पोलिसांकडे दाखल केली .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pooja khedkar again summoned by pune police in harassment case against collector suhas diwase pune print news rbk 25 asj