Pooja Khedkar Father Dilip Khedkar : माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेकीला केबीन मिळावी म्हणून दिलीप खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांशी वाद घातला होता. हिंदूस्थान टाईम्सने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. “काल रात्री बंडगार्डन पोलीस ठाण्यात आयपीसी कलम १८६, ५०४ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, पुणे पोलिसांच्या डीसीपी स्मार्थना पाटील यांनी पीटीआयने सांगितले.

तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार अर्ज दिला. पोलिसांकडून तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली. तर, आज याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. प्रशिक्षण काळात खेडकर यांनी स्वतंत्र दालनाची मागणी केली, तसेच मोटारीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली.

Pooja Khedkar in delhi high court
Pooja Khedkar : “मी AIIMS मध्ये जाण्यास तयार”, बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आरोपावरून पूजा खेडकर यांची दिल्ली उच्चन्यायालयात विनंती!
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Rajnath Singh
Rajnath Singh : “सशस्त्र दलांनी युद्धासाठी तयार राहावं”, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून सतर्कतेचा इशारा!
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
auction of company of sacked ias pooja khedkar family averted
पिंपरी : बडतर्फ आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या कंपनीचा लिलाव…

हेही वाचा >> Puja Khedkar: ‘मला अपात्रतेची नोटीस मिळाली नाही’, पूजा खेडकर UPSC विरोधात उच्च न्यायालयात; म्हणाल्या, “या निर्णयाविरोधात…”

खेडकर यांच्या बडेजावाची तक्रार जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे करण्यात आली. त्यानंतर दिवसे यांनी याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला. पूजा खेडकर यांना जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र दालन मिळावे, यासाठी दिलीप यांनी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला होता. प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन उपलब्ध करून दिले जात नाही, तसेच त्यांना कर्मचारी, कार्यालयीन कामकाजात शिपाई उपलब्ध करून दिले जात नाही. मुलगी पूजा खेडकर यांना सुविधा द्याव्यात, यासाठी दिलीप यांनी दबाव टाकला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तहसीलदार दीपक आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यांनी दिलेल्या दोन पानी तक्रार अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आकडे यांना जबाब नोंदविण्यासाठी बुधवारी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. मात्र, ते कामात व्यस्त असल्याने जबाब नोंदविण्यासाठी आले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, ३१ जुलै रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने एक प्रसिद्धीपत्रक काढून पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केल्याची घोषणा केली. पूजा खेडकर यांच्यावर फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. पूजा खेडकर यांनी यूपीएससीचे नियम पायदळी तुडवल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करून भविष्यात त्यांना यूपीएससीच्या कोणत्याही परीक्षेस बसता येणार नसल्याचे सांगितले गेले.

पूजा खेडकर यांना यूपीएससीला आव्हान देण्याचा अधिकार

यूपीएससीने दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की, ते दोन दिवसांत उमेदवारी रद्द करण्याच्या निर्णयाची प्रत पूजा खेडकर यांना देतील. तसेच उच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांना या निर्णयाच्या विरोधात अपील दाखल करण्याची मुभा दिली आहे.