Pooja Khedkar Reaction : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर  यांच्यावर विविध आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याकरता समिती गठीत करण्यात आली असून याचा अहवाल पोलीस महासंचलक रश्मी शुक्ला यांनी मागवला आहे. दरम्यान, माझ्याविषयी समाजमाध्यमातून चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा दावा पूजा खेडकर यांनी केला. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

पूजा खेडकर (Pooja Khedkar) म्हणाल्या, “माझ्याविषयी दररोज नवनवीन खोट्या बातम्या समोर येत आहेत. रोज काहीतरी नवीन येतंय. असा कोणता व्यक्ती असतो ज्याचं रोज काहीतरी नवीन येतं?

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
mukkampost bombilwadi mazi ladki janta yojna
मुक्कामपोस्ट बोंबिलवाडीची ‘लाडकी जनता योजना!’, पोस्ट होतेय व्हायरल, काय आहे ही योजना? वाचा…
Sadhvi Pragya Sing Thakur
Sadhvi Pragya : साध्वी प्रज्ञा यांनी पोस्ट केला सुजलेल्या चेहऱ्याचा फोटो; म्हणाल्या, “मी जगले वाचले तर काँग्रेसच्या टॉर्चरविरोधात…”
Nitesh Chavan And Isha Sanjay
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेतील राजश्रीची सूर्यादादासाठी खास पोस्ट; म्हणाली, “यामुळेच मी तुला…”
kartik aaryan on his dating life
कार्तिकने रिलेशनशिपच्या चर्चांवर सोडलं मौन; म्हणाला, “मी तर…”

“चुकीची माहिती पसरवली जातेय. यामुळे माझी खूप जास्त बदनामी होतेय. चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. कोणाचाही हस्तक्षेप होऊ नये म्हणून कोणतीही माहिती दिली जात नाहीय. कोणाचाही यात नकारात्मक हस्तक्षेप होऊ नये याकरता चौकशी समितीतील माहिती गुप्त ठेवली जाते”, असंही पूजा खेडकर (Pooja Khedkar) म्हणाल्या.

हेही वाचा >> Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी रात्री उशिरा केली तीन तास चौकशी, नेमके कारण गुलदस्त्यातच

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांची वाशिमच्या महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चमूने सोमवारी रात्री चौकशी केल्याची माहिती आहे. रात्री उशिरा तब्बल तीन तास त्यांच्यात बंद द्वार चर्चा सुरू होती. नेमक्या कुठल्या प्रकरणात पूजा खेडकर यांची चौकशी करण्यात आली किंवा पूजा खेडकर यांची काही तक्रार आहे का? यासंदर्भात खुलासा होऊ शकला नाही. अतिशय गोपनीय पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडली जात असून अधिकाऱ्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

याबाबत पूजा खेडकर (Pooja Khedkar) म्हणाल्या, “महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मी बोलावलं होतं. माझं काहीतरी काम होतं, त्यामुळे महिला कर्मचारी माझ्याकडे आले होते”, असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलं. दरम्यान, त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या व्हायरल व्हिडिओविषयी त्यांना विचारलं असता त्यावर भाष्य करणं त्यांनी टाळलं.

शासनाकडून चौकशी सुरू

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे अनेक वादग्रस्त प्रकार समोर येत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशिक्षणार्थी सहायक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना कामकाजादरम्यान सुसज्ज स्वतंत्र कक्षाची मागणी, कक्ष उपलब्ध न झाल्याने त्यांनी वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या ‘अँटी चेंबर’चा ताबा, आलिशान वाहनावर लाल आणि निळा दिवा लावून फिरणे आदी अनेक कारणांनी त्या चर्चेत आल्या. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे त्याचा अहवाल पाठवल्यावर पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली केली. त्यांनी यूपीएससीची परीक्षा देताना अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडले होते. त्याआधारे त्यांनी परीक्षा देत विशेष सवलत मिळवून आयएएस बनल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी शासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.