Pooja Khedkar Audi Car : भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी कार पुणे वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे. पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून वाहन पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करून खासगी कारवर व्हिआयपी नंबर प्लेटसह लाल आणि निळ्या रंगाचा दिवा लावला होता. त्यांच्या गाडीवर महाराष्ट्र सरकार असेही विनापरवाना लिहिलेले आहे. याव्यतिरिक्त एकूण २१ वेळा वाहतुकीचे नियम मोडल्याप्रकरण त्यांना २६ हजार रुपयांचाही दंड ठोठावण्यात आला आहे.

tarak mehta ka ooltah chashmah fame mandar chandwadkar dance with wife watch video
Video: ‘तारक मेहता…’ मधील भिडे मास्तर पोहोचले पेरुच्या शेतात अन् बायकोबरोबर केला मकरंद अनासपुरेंच्या गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
like aani subscribe movie on OTT
अमृता खानविलकर-अमेय वाघचा ‘लाईक आणि सबस्क्राईब’ चित्रपट OTT वर प्रदर्शित
Contractor charging Rs 2 each from commuters for free toilet at Thane railway station
ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहात लुबाडणूक
kasba peth in pune
पुण्यातील सर्वात जुनी पेठ! कसबा पेठेचं सौंदर्य दर्शवते पुण्याची संस्कृती, VIDEO एकदा पाहाच
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी

शनिवारी रात्री पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या कुटुंबीयांनी गाडीच्या चाव्या चतुश्रृंगी वाहतूक पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिल्यावर वाहतूक पोलिस विभागाने मालकांना कारची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अद्याप वाहतूक विभागाकडे कागदपत्रे जमा झालेली नाहीत.

हेही वाचा >> Pooja Khedkar यांची अनेक विभागांतील प्रशिक्षणाला दांडी, प्रशिक्षण घेतलेल्या ठिकाणी गैरवर्तन केल्याचे विभागप्रमुखांचे अहवाल

रुजू होण्यापूर्वीच सुविधांसाठी तगादा

पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी ऑगस्ट २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत मसुरी येथे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये नऊ महिने चार दिवस प्रशिक्षण घेऊन बाहेर पडल्या. नऊ दिवसांच्या संक्रमण कालावधीनंतर १५ एप्रिल ते ३१ मेपर्यंत (सात आठवडे) पुण्यातील यशदा येथे त्यांनी प्रशिक्षण घेतले. ३ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणाला सुरुवात केली. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षण कालावधी सुरू होण्यापूर्वीच म्हणजे एक आठवडाभरापासून २० मे पासून जिल्हाधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे वाहन, शासकीय निवासस्थान, कार्यालयात स्वतंत्र दालन आणि शिपाई आदी व्यवस्था करून ठेवण्याबाबत अगोदरच भेटी देऊन, व्हॉट्सॲपद्वारे संदेश पाठवून अधिकाऱ्यांकडे तगादा लावला होता. जिल्हा प्रशासनाकडून प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी असल्याने खेडकर यांना काही सुविधा पुरविल्या.

३० जुलै २०२५ पर्यंत प्रशिक्षणाचे नियोजन

१८ ते २१ जून (एक आठवडा) विभागीय आयुक्तालय, २४ ते २६ जून ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, २७ आणि २८ जून असे दोन दिवस जिल्हा न्यायालय, त्यानंतर १ ते ५ जुलै जिल्हा कोषागार कार्यालय आणि पुढील इतर सर्व शासकीय शाखा, आस्थापना, कार्यालयांमध्ये प्रशिक्षणासाठी ३० जुलै २०२५ पर्यंत प्रशिक्षणाचे नियोजन होते. मात्र, जिल्हा कोषागार कार्यालयातील प्रशिक्षणानंतर गैरवर्तणुकीमुळे पुढील प्रशिक्षणासाठी त्यांना (Pooja Khedkar) राज्य शासनाकडून वाशिम जिल्ह्यात पाठविण्यात आले.