पुणे : सामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी यंदाही दी पूना मर्चंट्स चेंबरकडून रास्त भावात लाडू-चिवडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या उपक्रमाचे ३५ वे वर्ष आहे. येत्या सोमवारपासून (१७ ऑक्टोबर) लाडू-चिवडा उपक्रमास प्रारंभ होणार आहे.

लाडू-चिवडा उपक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते १७ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. आमदार माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त विक्रमकुमार या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. मार्केट यार्ड-गंगाधाम परिसरातील जयजिनेंद्र प्रतिष्ठानच्या नाजुश्री सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी लाडू-चिवड्याच्या प्रति किलोचा भाव दीडशे रुपेय आहे आहे. अर्धा किलोचा भाव ८० रुपये असल्याची माहिती दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव रायकुमार नहार, सहसचिव ईश्वर नहार, माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले या वेळी उपस्थित होते.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Aditi Tatkare
मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?
Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Patra Chawl Redevelopment Project
विश्लेषण: पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार… विलंब का? लाभ कुणाला मिळणार?

चेंबरच्या सदस्यांच्या देखरेखीखाली उत्कृष्ट पॅकिंगमध्ये तसेच स्वच्छ वातावरणात लाडू-चिवडा तयार केला जातो. पप्पू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जयजिनेंद्र प्रतिष्ठान येथे अहोरात्र लाडू, चिवडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

वीस ठिकाणी विक्री केंद्रे

सोमवारी सायंकाळपासून शहरातील वीस विक्री केंद्रावर लाडू-चिवडा विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दी पूना मर्चंट्स चेंबरचे मार्केट यार्डातील व्यापार भवन, ग्राहक पेठ (टिळक रस्ता), आझाद मित्र मंडळ (पुष्पमंगल कार्यालय, बिबवेवाडी), शेष क्रेशर बंगला (ओसवाल बंधू मंगल कार्यालयासमोर, शंकरशेठ रस्ता), जयश्री ग्रोसरी अँड ड्रायफ्रुटस प्रा. लि. (कोथरुड), भगत ट्रेडर्स (सिंहगड रस्ता), आगरवाल सेल्स काॅर्पोरेशन (कर्वेनगर), व्ही. एन. एंटरप्रायजेस (पदमावती मंदिरासमोर), अर्बन बझार (सिंहगड रस्ता), पवन ट्रेडर्स (चंदननगर), श्रीराम जनरल स्टाेअर्स (चिंचवड), निखील ग्रोसरी वर्ल्ड (आळंदी). विजय ट्रेडिंग कंपनी (काेंढवा), श्री वर्धमान जैन श्रावक संघ (आकुर्डी), श्री साई सामाजिक सेवा (कसबा पेठ), श्री लक्ष्मी ब्युटी चाॅईस लेडीज शाॅपी (खडकी), सह्याद्री सेवा प्रतिष्ठान (पर्वती), दिपिका दीपक नेवे (खराडी) अशा वीस ठिकाणी लाडू-चिवडा विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे.