पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. बाल न्याय मंडळाच्या आदेशाने मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. मुलाला बुधवारपर्यंत (ता. ५) बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश असून, त्य़ाची रवानगी व्यसनमुक्ती केंद्रात करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

accident on Bandra Worli Bridge
दोन वर्षांपूर्वीचा वांद्रे-वरळी सेतूवरील विचित्र अपघात; मानिसक आजाराने ग्रस्त कार चालकाला उच्च न्यायालयाकडून जामीन
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
Toddler killed by water tanker in pune
टँकरच्या चाकाखाली सापडून एक वर्षांच्या बालकाचा मृत्यू
police injured , mumbai , rickshaw ,
मुंबई : पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले, रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल
Police file case against auto driver for dragging cop at mankhurd
पोलिसाला रिक्षासोबत फरफटत नेले; रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल
accused akshay shinde encounter
अन्वयार्थ : हत्येचा गुन्हा दाखल कराच
person who came to Thane for selling whale fish vomit ambergris arrested by thane Polices Crime Investigation Branch
वारजे भागात सराईताकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सराईत अटकेत

हेही वाचा >>> बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली

कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलिसांनी तीन गुन्हे दाखल केले आहेत. अपघाताचा गुन्हा स्वत:वर घेण्यासाठी मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब यांना धमकाविल्याप्रकरणी विशाल आणि त्याचे वडील सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली. मुलाच्या रक्ताचे नमुने बदल प्रकरणात ससून रुग्णालयातील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. मुलाला वाचविण्यासाठी ससूनमध्ये स्वत:चे रक्त दिल्याप्रकरणी मुलाची आई शिवानी अगरवालला अटक करण्यात आली आहे. मुलाला मद्याची विक्री प्रकरणात पबचालक, व्यवस्थापकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

अपघात प्रकरणाचा खटला जलदगतीने चालविण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. या खटल्यात विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. खटला जलदगतीने चालविण्यात आल्यास अपघातात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल. या खटल्यात आरोपींविरुद्ध लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा >>> ससूनच्या प्रशासनाला उशिरा जाग! आता डॉक्टरांना आरोपींची तपासणी करण्याचे प्रशिक्षण मिळणार

पबचालकांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

अल्पवयीन मुलाला मोटार चालविण्यास दिल्याप्रकरणी त्याचे वडील विशाल अगरवाल आणि अल्पवयीन मुलाला मद्य विक्री प्रकरणी कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात विशाल, कोझी, ब्लॅक पबच्या मालकांसह कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर बुधवारी सुनावणी होणार आहे. अल्पवयीन मोटारचालकाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी ससूनच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि आपत्कालीन विभागाचा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यासह शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलीस कोठडीत ५ जूनपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशाल अगरवाल आणि त्याची पत्नी शिवानी यांनाही ५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Story img Loader