पुणे : राज्यातील वातावरणाची स्थिती पाहता नोव्हेंबरअखेपर्यंत यंदाही हवामानाचे हेलकावे अनुभवण्यास मिळणार आहेत. नोव्हेंबरच्या सुरुवातीस असलेली थंडी आता कमी होऊ लागली असून, अनेक भागांत अंशत: ढगाळ वातावरण तयार झाले आहे. त्यातच चार ते पाच दिवसांत दक्षिण कोकणात तुरळ ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या महिन्यात पुढील काळात वातावरणाच्या स्थितीत सातत्याने बदल होणार असल्याने ऊन, थंडी आणि पाऊस आदी तीनही ऋतूंची अनुभूती मिळण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवडय़ात किमान तापमानात झपाटय़ाने घट होऊन गारवा निर्माण झाला. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही राज्याच्या बहुतांश भागांतील तापमानात घट होऊन थंडी अवतरली. या काळामध्ये राज्यात आकाशाची स्थिती निरभ्र आणि कोरडय़ा हवामानाची निर्माण झाल्याने प्रामुख्याने किनारट्टीच्या भागात कोकण विभागामध्ये आणि विदर्भात काही भागांत दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका वाढला. याच कालावधीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात बहुतांश भागात तापमानाचा पारा घसरला होता. औरंगाबाद, पुणे, नगर, नाशिक, जळगाव आदी भागांत नीचांकी तापमानाची नोंद झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility experiencing all three seasons throughout the month bad weather in november ysh
Show comments