आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा एकत्र लढवण्याची शक्यता आहे. याबाबत ची चर्चा मुंबईत झालेल्या बैठकीत झाली आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजप चे नेते उपस्थित होते. अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : अमृत सरोवर योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ९० तलावांची निवड

मुंबईत नुकतीच भाजपा नेते हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, विजय शिवतारे, भाजप आमदार महेश लांडगे, आमदार राहुल कुल यांच्यासह शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजी आढळराव आदींच्या उपस्थितीत बैठक पार पडली. बैठकीत आगामी महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गट एकत्र येणार का? याविषयी चर्चा झाली असून अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली आहे.

हेही वाचा- परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट; धनंजय मुंडे म्हणाले, “कृषीमंत्री तर सोडा, इतर मंत्रीदेखील कुठं…”

भाजपा आणि शिंदे गट पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची निवडणूक एकत्र लढवल्यास अधिक रंगतदार होईल. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेवर भाजपची सत्ता होती. आगामी महानगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष सत्ता खेचून आणण्यासाठी शड्डू ठोकून आहे. पण, शिंदे गट आणि भाजप एकत्र लढल्यास राष्ट्रवादी पक्षाला अधिक ताकद लावावी लागणार आहे. 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Possibility of upcoming pimpri chinchwad municipal corporation elections will be contested by shinde group and bjp together dpj kjp