पिंपरी- चिंचवड: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळल्यानंतर शिंदेंच्या पक्षातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या लोकप्रिय ठरलेल्या योजना देखील बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यामुळेच एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच बोलल जात आहे.

अशातच आता पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या समोर “एकनाथ शिंदे हे देव माणूस आहेत, त्यांचे निर्णय बदलू नका”. अशा आशयाचे फ्लेक्स लावून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना विनंती करण्यात आली आहे. अद्याप फ्लेक्स कोणी लावले आहेत. हे समजू शकले नाही. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांनी हे फ्लेक्स लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ‘आनंदाचा शिधा’, ‘तीर्थ दर्शन’ यासारख्या योजना त्यांनी सरकारच्या माध्यमातून आणल्या होत्या. परंतु, या योजनांना महायुतीच्या सरकारने ब्रेक लावला आहे. या सगळ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पक्षातून अनेक नेत्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. विरोधकांनी या योजना केवळ निवडणुकीपुरत्या होत्या अशी टीका केली आहे.

stranger murder in bharati vidyapeeth premises
भारती विद्यापीठ परिसरात अनोळखी व्यक्तीचा खून
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
next cm in delhi wont stay in sheeshmahal
Delhi CM: दिल्लीतला ‘शीशमहल’ ओस पडणार? भाजपाचे मुख्यमंत्री निवासस्थान बदलणार!
Tanaji Sawant Son Missing
Tanaji Sawant Son Missing : तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंत सुखरुप परतला; नेमकं काय झालं होतं? पुणे पोलिसांनी दिली मोठी माहिती
Sanjay raut on all part mps meeting
Maharashtra Breaking News LIVE Updates : “श्रीमंतांची मुलं चार्टर प्लेननं बँकॉकला…”, तानाजी सावंत यांच्या मुलासंदर्भात संजय राऊतांची खोचक टिप्पणी!
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
shopping gets shapped by emi and budget 2025 announcments
Indian Market Analysis: साबण झाले छोटे, टीव्ही झाले मोठे; भारतीय बाजारात ग्राहकांची खरेदीची पद्धत बदलू लागलीये!
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Story img Loader