लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : आवक कमी झाल्याने बटाटा, गवार, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, बीट आणि घेवड्याच्या दरात वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

mmrda acquire farmers lands in 124 villages of uran panvel and pen for third mumbai
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांची एकजूट; उरण, पनवेलमधील १२४ गावे संपादित करण्याची अधिसूचना
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Maharashtra grape cultivation
पाच वर्षांत पन्नास हजार एकर द्राक्ष लागवड क्षेत्रात घट, उत्पादन खर्च वाढल्याने अन्य पिकांकडे कल
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
Gondia known as Maharashtra s granary sees farmers shifting towards maize and gram this rabi season
धानाचे कोठार, पण शेतकऱ्यांचा कल मका, हरभऱ्याकडे
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (२० ऑक्टोबर) राज्य, तसेच परराज्यातून मिळून ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. गेल्या आठवड्यात फळभाज्यांची आवक कमी झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ७ ते ८ टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ३ ते ४ टेम्पो कोबी, कर्नाटकातून २ टेम्पो पावटा, कर्नाटक आणि गुजरातमधून ३ ते ४टेम्पो घेवडा, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ३ ते ४ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ५ ते ६ टेम्पो गाजर,गुजरातमधून ३ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून ७ ते ८ टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-नाकाबंदीत मद्यपी वाहनचालकाकडून पोलिसांना धक्काबुक्की, पुणे स्टेशन परिसरातील घटना

पुणे विभागातून सातारी आले ४०० ते ५०० गोणी, भेंडी ५ ते ६ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो सहा ते साडेसहा हजार पेटी, हिरवी मिरची २ ते ३ टेम्पो, ढोबळी मिरची ७ ते ८ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ४० ते ५० गोणी, काकडी ७ ते ८ टेम्पो, कोबी ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर ७ ते ८ टेम्पो, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ३५ ते ४० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबिर, मेथी, अंबाडी, पालक, पुदिन्याच्या दरात वाढ

कोथिंबिर, मेथी, अंबाडी, पालक, पुदिना या पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली. राजगिऱ्याच्या दरात घट झाली असून, शेपू, कांदापात, चुका आणि चवळईच्या दरात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. चाकवत, करडई, मुळा, राजगिऱ्याचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबीर ८० हजार जुडी, तसेच मेथीच्या ५० हजार जुडींची आवक झाली. पालेभाज्यांचे शेकड्याचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर- १००० ते २०००, मेथी – १५०० ते २५००, शेपू – ८०० ते १२००, कांदापात- ८०० ते १५००, चाकवत – ६०० ते ८००, करडई- ४०० ते ७००, पुदिना – ५०० ते १०००, अंबाडी – ५०० ते ८००, मुळे – ८०० ते १५००, राजगिरा- ४०० ते ७००, चुका – ५०० ते ८००, चवळई- ३००-७००, पालक- १०००-१८००.

आणखी वाचा-ब्रिटीश गायक ॲलन वॉकर रजनीत चोरट्यांचा धुमाकूळ, ३६ मोबाइल चोरी; चौघे गजाआड

डाळिंब, पपई, पेरुच्या दरात घट

डाळिंब, पपई, पेरुच्या दरात घट झाली. कलिंगड, खरबूज, कलिंगडाच्या दरात वाढ झाली. संत्री, मोसंबी, सीताफळ, चिकूचे दर असल्याची माहिती फळबाजारातील व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ५० ते ६० टन, संत्री २० ते २५ टन, डाळिंब ४० ते ५० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे एक ते दीड हजार गोणी, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, चिकू दीड हजार गोणी, पेरू एक हजार ते १२०० प्लास्टिक जाळी (क्रेट), अननस ४ ट्रक, सीताफळ ५० ते ५५ टन अशी आवक झाली.

Story img Loader