पिंपरी: सध्याच्या पूरपरिस्थितीत पिंपरी-चिंचवड शहरातील संभाव्य बाधित भाग महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (१५ जुलै) घोषित करण्यात आले. या भागातील नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
माता रमाईनगर, भाटनगर, बौध्दनगर (अ प्रभाग), मोरया गोसावी मंदिर परिसर (ब प्रभाग), पिंपळे गुरव नदीकाठचा परिसर (ड प्रभाग), बोपखेल गावठाण नदीकाठचा परिसर (इ प्रभाग), संजय गांधीनगर, पिंपरी, रहाटणी नदीकाठचा परिसर (फ प्रभाग), सांगवी मधुबन सोसायटी, संगमनगर, ममतानगर, दापोडी बौध्दविहार व स्मशानभूमी, नदीकाठचा परिसर, पवना वस्ती (ह प्रभाग) हे संभाव्य बाधित भाग असल्याचे महापालिकेने जाहीर केले आहे. या भागातील रहिवाशांनी खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालिकेने केले आहे.