बारामती : – बारामती शहरा नजीक असलेले औद्योगिक वसाहत परिसरातील महापारेषण कंपनीच्या २२० केव्ही उपकेंद्रातून वीज पुरवठा करणारी केबल जेसीबी कडून तुटल्याने आज दुपारपासून संध्याकाळी आठ वाजे दरम्यान वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे बारामती अंधारात होती.

याबाबत बारामती एमआयडीसी महापारेषण कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार २२० केव्ही उपकेंद्रातून महावितरणाच्या ऊर्जा भवन बारामतीच्या सिटी ३३ केव्ही उपकेंद्राला वीज पुरवठा करणाऱ्या उच्च दाब वीज वाहिनीची केबल बारामती शहरातील रस्त्याचे काम चालू असताना जेसीबीच्या वाहनाकडून तुटल्याने बारामती शहरातील बहुतांश भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता.

आज मंगळवार (दिनांक २६ )रोजी दुपारी रस्त्याचे काम चालू असताना जेसीबीच्या वाहना द्वारे वीज वाहिनीची केबल तुटल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आलेला होता.

तुटलेला केबलची दुरुस्ती करण्यासाठी महापारेषण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने जोडणी करण्याचा प्रयत्न करून दुपारी तीन दरम्यान गेलेली वीज संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान वीज पुरवठा सुरळीत करण्यामध्ये यश आले,

सध्या दुपारच्या कड़क वाढत्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण होत असताना अचानकपणे गेलेल्या विजेमुळे बारामतीतील नागरिकांची मोठी कुचुंबना झाली, बाजारपेठेतील आणि घरातील पंखे टीव्ही विद्युत पुरवठा बंद असल्याने तसेच या दरम्यानच मोबाईलचे नेटवर्क बराच काळ सुरळीत नसल्यामुळे अनेकांच्या दैनंदिन कामाच्या अडचणीमध्ये वाढच झाली आहे.

आज संध्याकाळी उशिरापर्यंत काम चालू ठेवून उच्च दाब वीज वाहिनीची केबल दुरुस्त करण्यामध्ये कर्मचाऱ्यांना यश आले, आणि साधारण साडेसात आठच्या दरम्यान बारामती शहर आणि परिसरातील विद्युत पुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली, वीज ग्राहकांचा झालेला या गैरसोयीबद्दल महावितरण कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Story img Loader