पुणे : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या (पीजीसीआयएल) ४०० केव्ही शिक्रापूर ते तळेगाव अतिउच्चदाब वीजवाहिनी तुटल्याने पिंपरी चिंचवड परिसर, शिक्रापूर, उर्से, थेऊर, पेरणे आदी परिसरातील ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.  दरम्यान विजेची मागणी कमी असल्याने भार व्यवस्थापनाद्वारे पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्याचे प्रयत्न महावितरणकडून युद्धपातळीवर सुरु आहेत. तर काही भागात नाईलाजास्तव चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे : ‘राष्ट्रवादी’ अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख

याबाबत माहिती अशी की, पीजीसीआयएलच्या शिक्रापूर ते तळेगाव ४०० केव्हीच्या अतिउच्चदाब चारपैकी एक वीजवाहिनी तळेगाव एमआयडीसीजवळ आज सकाळी नऊ वाजता तुटली. त्यामुळे सुमारे ३५५ मेगावॅट विजेचे वहन ठप्प झाले. परिणामी पिंपरी गाव, रहाटणी, पिंपळे सौदागर, काळेवाडी, चिंचवड गाव, वाल्हेकरवाडी, रावेत, देहू रोड, खराडी, जुना मुंढवा, थिटेवाडी, थेऊर, पेरणे, शिक्रापूर, कोरेगाव भिमा, सणसवाडी, कोरेगाव मूळ आदी परिसरातील वीजपुरवठा बंद पडला.

हेही वाचा >>> पुणे : ‘राष्ट्रवादी’ अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख

पॉवर ग्रीडच्या अतिउच्चदाब ४०० केव्ही वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यास सात ते आठ तास लागण्याची शक्यता आहे. दरम्यान महापारेषण व महावितरणच्या संयुक्त प्रयत्नातून भारव्यवस्थापनाद्वारे पर्यायी स्वरुपात वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही ठिकाणी नाईलाजाने चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power outage due to fault in high voltage power lines in pimpri chinchwad pune print news vvk 10 zws
Show comments