पुण्यातील खराडी ते थेऊर या अतिउच्चदाब मनोरा वीज वाहिनीच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे शहरातील विमाननगर, कल्याणीनगर, नगर रस्ता आणि येरवडा या परिसरामध्ये रविवारी (८ मे) पहाटे चार ते सहा वाजेदरम्यान वीजपुरवठा बंद राहणार आहे. उन्हाच्या झळा तसेच दैनंदिन कामांमध्ये नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पहाटेच्या सुमारास दोन तासांत दुरुस्तीचं पूर्ण करण्यात येणार असल्याचं महावितरणकडून कळवण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

महापारेषण कंपनीच्या थेऊर ते खराडी तसेच लोणीकंद ते खराडी या वीज मनोऱ्याच्या वाहिनीतील तांत्रिक काम प्रस्तावित आहे. हे काम अत्यावश्यक असल्याने पूर्वनियोजन करून रविवारी पहाटे दोन तासांत ते पूर्ण करण्यात येणार आहे. या कामामुळे खराडी अतिउच्च दाब उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या महावितरणच्या १९ वाहिन्या बंद राहणार आहेत. महावितरणकडून १९ पैकी ११ वाहिन्यांचा वीजपुरवठा महापारेषणाच्या मगरपट्टा, थेऊर, व्हीएसएनएल या अतिउच्च दाब उपकेंद्राद्वारे पर्यायी स्वरुपात सुरू ठेवण्यात येणार आहे. मात्र, विजेचे भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास काही वीजवाहिन्यांचा वीजपुरवठा पहाटे दोन तास बंद ठेवावा लागणार आहे.

या भागात वीजपुरवठा राहणार खंडित
रविवारी पहाटे ४ ते ६ वाजेदरम्यान गांधीनगर, यशवंतनगर, गणेशनगर, जयप्रकाशनगर, लक्ष्मीनगर, भाटनगर, सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा गाव, रामनगर, महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी, पीडब्लूडी वसाहत, त्रिदलनगर, नागपूर चाळ, सह्याद्री हॉस्पिटल परिसर, विमाननगर, रोहन मिथीला सोसायटी, साकोरेनगर, राजीवनगर नॉर्थ व साऊथ, गणपती मंदिर चौक, दत्त मंदिर चौक, श्रीकृष्ण हॉटेल, फिनिक्स चौक, श्रीरामनगर, पारेशरनगर, फॉरेस्ट पार्क, खुळेवाडी, खांदवेनगर, विमानतळ रोड, रामवाडी गावठाण, चंदननगर, संघर्ष चौक, प्रितनगर, अष्टविनायक नगर, पद्मय्या सोसायटी, बोराटेवस्ती, यशवंतनगर, तुकारामनगर, गणपती हाऊसिंग सोसायटी, शेजवळ पार्क, साई पार्क, वृंदावन कॉलनी, म्हाडा कॉलनी या परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे.