राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे शहर कार्याध्यक्ष म्हणून प्रदीप देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देशमुख यांना नियुक्तिपत्र दिले आहे. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ या वेळी उपस्थित होते. विद्यार्थिदशेपासून प्रारंभी कॉंग्रेस आणि त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे काम प्रदीप देशमुख यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी अध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. अजित पवार यांचे निकटवर्तीय अशी प्रदीप देशमुख यांची ओळख आहे. अमेरिका, मलेशिया, तसेच आशियाई देशांमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे देशमुख यांनी नियुक्तीनंतर सांगितले.
पुणे : ‘राष्ट्रवादी’ अजित पवार गटाच्या कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे देशमुख यांनी नियुक्तीनंतर सांगितले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 08-07-2023 at 13:17 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradeep deshmukh appointed as pune city working president of ajit pawar group pune print news apk 13 zws