उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाच्या परिसरात स्फोटके ठेवल्या प्रकरणी अटकेत असलेले चकमक फेम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा गेल्या तीन महिन्यांपासून ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. शर्मा यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती.सुरक्षिततेच्या कारणांंमुळे शर्मा यांना मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहातून येरवडा कारागृहात हलवण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुणे : मूल्य साखळीचा विकास गरजेचा ; केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे प्रतिपादन

कारागृहात पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर कारागृहात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर शर्मा यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कारागृहात नेण्यात आल्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.शर्मा गेल्या तीन महिन्यांपासून ससून रुग्णालयात आहेत. याबाबत कारागृह प्रशासन आणि ससून रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधण्यात आला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pradeep sharma stayed in sassoon hospital for three months pune print news amy