बारामती: ” क्रेडाई महाराष्ट्र “ही महाराष्ट्रातील  रियल इस्टेट डेव्हलपरची शिखर संस्था असून  महाराष्ट्रातील एकूण ६६ शहरातील संघटना  या संस्थेची संलग्न आहेत, ही क्रेडाइ संस्था महाराष्ट्रातील ग्राहक बांधकाम व्यावसायिकांच्या हितासाठी व शासनाच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेमध्ये  योगदान देत असते, या संस्थेच्या अध्यक्षपदाचा मान पहिल्यांदाच बारामतीला मिळालेला असून  प्रफुल्ल तावरे यांचे अध्यक्ष म्हणून तर  खजिनदार म्हणून सुरेंद्र भोईटे यांची निवड झाली आहे,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यानिमित्ताने खजिनदार आणि अध्यक्षपद  हे दोन्ही पदे एकाच वेळी बारामतीला मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, सन दोन हजार पंचवीस ते सत्तावीस या कालावधीसाठी क्रेडाइ महाराष्ट्राच्या अध्यक्ष म्हणून  श्री प्रफुल्ल तावरे यांची आणि खजिनदार म्हणून श्री. सुरेंद्र भोईटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, ही निवड बारामतीसाठी अभिमानाची बाब आहे, या निवडीमुळे क्रेडाई मधून  बारामतीला महाराष्ट्राची प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.

क्रेडाई महाराष्ट्र महारेरा या नियमक मंडळाची एस आर ओ म्हणून काम करीत आहे, महाराष्ट्रातील डेव्हलपर्सना रेरा रजिस्ट्रेशन व इतर संलग्न विषयावर मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे, तसेच क्रेडााई महाराष्ट्र जीएसटी,महसूल, नगर विकास अशा अनेक विषयांवर डेव्हलपर्सना मार्गदर्शन करण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे क्रेडायचे आतापर्यंतचे अध्यक्षपद विचारत घेता जिल्हा आणि मोठ्या शहरातील बांधकाम व्यवसायिकांनाच मान मिळाला आहे, आज पर्यंत तालुका स्तरावर प्रथमच क्रेडाई महाराष्ट्र अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळालेली आहे.