पिंपरी : जिद्द असेल, तर यश साध्य होतेच. घरची परिस्थिती गरीब असूनही जबरदस्त इच्छाशक्ती आणि कठोर मेहनतीच्या जोरावर येथील प्रगती काशीद हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत दुहेरी यश मिळवले आहे. परीक्षेतील यशामुळे तिच्या करिअरच्या ‘प्रगती’चा मार्ग सुकर झाला आहे.

विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी या दोन्ही पदांना प्रगतीने गवसणी घातली आहे. वयाच्या २४ व्या वर्षी हे यश मिळविणाऱ्या प्रगतीने परीक्षेतील यशाद्वारे आपले कर्तृत्वही सिद्ध केले आहे. चिखली, मोरेवस्ती येथे वास्तव्यास असलेल्या प्रगतीचे वडील शिवाजी हे रिक्षाचालक, तर आई रेणुका गृहिणी. सातवीत असतानाच प्रगतीने ‘एमपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याचे ध्येय उराशी बाळगले होते. बीएसस्सीची पदवी घेतल्यानंतर प्रगतीने २०२० पासून एमपीएसी परीक्षेची तयारी सुरू केली.

Sakoli, Nana Patole, Somdutt Karanjkar, teli vote,
साकोलीत पटोले, करंजेकर व ब्राह्मणकर अशी तिहेरी लढत, तेली, कुणबींच्या मतांवर विजय अवलंबून
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
लक्षवेधी लढत : यशोमती ठाकूर यांच्यासमोर भाजपचे आव्हान
Rahul Gandhi ashok chavan nanded
नांदेडमध्ये राहुल गांधींकडून चव्हाण कुटुंबिय बेदखल !
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
jayant patil islampur loksatta
सांगलीत जयंत पाटील यांची कसोटी
rebellion of jayashree patil three way contest in the sangli assembly constituency
सांगलीत दादा घराण्याच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

हेही वाचा…पोर्शे अपघात प्रकरणातील खटले जलदगती न्यायालयात चालवावेत, पोलीस आयुक्तांची न्यायालयाकडे मागणी

प्रचंड कष्ट घेऊनही पहिल्या प्रयत्नात अवघ्या दोन गुणांनी तिला अपयशाचा सामना करावा लागला. पण, ती खचून गेली नाही. तिने जिद्दीने पुन्हा तयारी सुरू केली. नियमित पहाटे साडेपाच वाजता उठून ती अभ्यासाला बसायची. दररोज दहा तास अभ्यास करायची. तिच्या याच मेहनतीने तिला हे यश दिसू शकले आहे. तिची आता विक्रीकर निरीक्षक आणि मंत्रालयातील सहायक कक्ष अधिकारी पदांवर निवड झाली आहे.

प्रगतीने हे यश अतिशय नम्रपणे स्वीकारले आहे. तिची परीक्षेतील कामगिरीविषयीची प्रतिक्रियाच याबाबत बोलकी आहे. ती म्हणते, ‘हार मानायची नाही. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर यश हमखास मिळतेच.’

हेही वाचा…अमोल घटुकडे राज्यात प्रथम, एमपीएससीतर्फे ‘पीएसआय’ची गुणवत्ता यादी जाहीर

शंभर घाव घातल्यानंतर कठीण दगड फुटतो. याचा अर्थ ९९ घाव व्यर्थ गेले असा होत नाही. त्यामुळे यश मिळेपर्यंत प्रयत्न करीत राहायचे, असे प्रगती काशीद म्हणाली.