Prakash Ambedkar Pune PC : नुकताच झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला. अतिशय चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणुकीत रवींद्र धंगेकर ११ हजार मतांनी विजयी ठरले. तर पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप यांचा विजय झाला. दरम्यान, पुण्यातील या निकालानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलं असताना या निकालावर वंजित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – मटण खाऊन देवदर्शन केल्याचा विजय शिवतारेंचा आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “यासंदर्भात मी…”

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

“पोटनिवडणुकीच्या निकालातून फार काही साध्य होईल, असं नाही. मुळात हा निकाल सरकारच्या विरोधात आहे. सरकारच्या नाकार्तेपणाविरोधात लोकांनी कसब्यात मतदान केलं. पिंपरी चिंचवडमध्येही जनमत हे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात असल्याचं दिसून आलं”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे हे सध्या धृतराष्ट्राच्या भूमिकेत”; खेडमधील सभेपूर्वी संजय शिरसाटांची सकडून टीका; म्हणाले, “आजच्या सभेचा मुख्य उद्देश…”

“कसब्यातील विजय हा धंगेकरांचा”

“गेल्या निवडणुकीची आणि आताच्या निवडणुकीची आकडेवारी बघितली, तर भाजपाच्या मतांमध्ये फारशी घट झालेली दिसत नाही. फक्त गेल्यावेळी घंगेकरांना तीन-साडेतीन हजार मतं कमी पडली होती. ती त्यांनी या निवडणुकीत भरून काढली. त्यामुळे महाविकास आघाडी पेक्षा कसब्यातील विजय हा धंगेकरांचा विजय आहे”, असं मी मानतो, असेही ते म्हणाले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prakash ambedkar reaction on pune bypoll election result spb